कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड; कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच अन् धोबी पछाड - छगन भुजबळ

By अजित घस्ते | Updated: April 10, 2025 15:17 IST2025-04-10T15:15:32+5:302025-04-10T15:17:47+5:30

एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांच्या उरावर बसणे याला रोजच्या राजकीय जीवनात सामोरे जावे लागते

Chhagan Bhujbal has said that every leader in Maharashtra politics faces many difficulties | कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड; कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच अन् धोबी पछाड - छगन भुजबळ

कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड; कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच अन् धोबी पछाड - छगन भुजबळ

पुणेः राजकीय आयुष्याच्या वाटचालीत नक्की कोण कोणाचा प्रतिस्पर्धी हे सांगणे अवघड असते. एकमेकांचे पाय ओढणे, एकमेकांच्या उरावर बसणे याला रोजच्या राजकीय जीवनात सामोरे जावे लागते. कोण कोणाला धोबी पछाड करेल, हे सांगता येत नाही. कुस्तीप्रमाणेच राजकारणतही डावपेच आणि डाव-प्रतिडाव सुरू असतात असे मत आमदार छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

पै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठानतर्फे कै.बेनकर यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित जिल्हा आणि तालुकास्तरीय निमंत्रित मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन गुरूवार छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

 भुजबळ म्हणाले की, मुलगा-मुलगी असा भेदभाव न करता मुलांप्रमाणेच मुलींना देखील क्रीडा क्षेत्रात समान संधी मिळाल्यास त्या त्यांची चुणूक दाखवून देतात. लहान वयातच मुला-मुलींवर खेळांचे संस्कार झाल्यास ते ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यापर्यंत मजल मारू शकतात. शहरांसोबतच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुला-मुलींचे क्रीडा कौशल्य ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी सोसलेले कष्ट आणि हालअपेष्टा यांची जाणीव ठेवत समाजाने मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही राहिले पाहिजे. यातून नवीन पिढीध्ये महिलांना आदर देण्याचे संस्कार रूजवता येतील. मुलींनी खेळांबरोबरच राजकारणात येणे देखील आवश्यक आहे. कारण मोदी सरकार २०२९ मध्ये विधानसभा आणि विधान परिषदेसाठी महिलांना ५० टक्के आरक्षण लागू करणार आहे. राजकीय घराण्यांचा धांडोळा घेतला असता वडिलांचा राजकीय वारसा चालविणाऱ्या अनेक मुली आपल्याला सध्याच्या राजकारणात दिसून येतात. शरद पवार-सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक उदाहरणे आढळून येतात.

Web Title: Chhagan Bhujbal has said that every leader in Maharashtra politics faces many difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.