छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ संपन्न! 15 ऑक्टोबरला कारखाना होणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 12:25 AM2022-10-06T00:25:50+5:302022-10-06T11:55:01+5:30

कारखान्याकडे 86032 या ऊस जातीचे लागण क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत 64 टक्के आहे....

Chhatrapati Factory's Sifting Season Commencement Completed! The factory will start on October 15 | छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ संपन्न! 15 ऑक्टोबरला कारखाना होणार सुरू

छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम शुभारंभ संपन्न! 15 ऑक्टोबरला कारखाना होणार सुरू

googlenewsNext

सणसर (पुणे): भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा 67 वा ऊस गळीत हंगाम व बॉयलर पूजन कारखान्याचे संचालक बाळासाहेब सपकाळ व त्यांच्या पत्नी मंदाकिनी व नवीन प्लांटचे कुंदन देवकाते व त्यांच्या पत्नी तेजश्री देवकाते यांच्या हस्ते संपन्न झाले. अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की, कारखाना 15 ऑक्टोबरला सुरू होणार असून सभासदांनी कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करावे. यावर्षी सभासदांच्या उसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येणार आहे. कारखान्याकडे 86032 या ऊस जातीचे लागण क्षेत्र एकूण क्षेत्राच्या तुलनेत 64 टक्के असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, चेअरमन अविनाश घोलप, संचालक बाळासाहेब पाटील, रणजीत निंबाळकर, राजेंद्र गावडे, दीपक निंबाळकर, रसिक सरक, दत्तात्रय सपकळ, कार्यकारी संचालक अशोक जाधव, संचालक भाऊसाहेब सपकळ, कामगार नेते युवराज रणवरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रशांत पवार, शेतकरी कृती समितीचे विशाल निंबाळकर, यांच्यासह सर्व संचालक सभासद कामगार उपस्थित होते.

तर ती ऐतिहासिक चूक ठरेल-

सध्या भवानीनगर कारखान्यासमोरून संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग जात आहे. कारखान्याच्या अगदी संरक्षक भिंती लगतच उड्डाणपूल होणार असल्याने त्याचा फटका कारखान्यास मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. अजूनही वेळ गेली नाही पालखी मार्गाची दिशा बदलण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच दत्तात्रय भरणे यांच्यासह केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांपर्यंत आपण पाठपुरावा करू हा पूल झाल्यास ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ठरणार आहे. त्याची किंमत कारखान्यासह सर्व सभासदांना चुकवावी लागणार असल्याचे पृथ्वीराज जाचक यांनी सांगितले.

Web Title: Chhatrapati Factory's Sifting Season Commencement Completed! The factory will start on October 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.