छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक दयनीय अवस्थेत, जबाबदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 18:34 IST2025-02-09T18:34:37+5:302025-02-09T18:34:53+5:30
कामही सुरू झाले होते, मात्र अचानक त्यात अडथळे आले आणि काम थांबले

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक दयनीय अवस्थेत, जबाबदार कोण?
सहकारनगर - पुणे शहरातील डेक्कन येथे स्थित छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, जे १९८६ पासून सु आवस्तेत आहे, गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय स्थितीत आहे. स्मारकाच्या जीर्णोद्धारासाठी भूमिपूजन करण्यात आले होते, आणि कामही सुरू झाले होते, मात्र अचानक त्यात अडथळे आले आणि काम थांबले.
काही संघटनांच्या देखरेखीखाली महानगरपालिकेने काम सुरू केले होते. तथापि, सध्या स्मारकाची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचे पाहायला मिळत आहे, ज्यामुळे शंभू प्रेमींमध्ये नाराजी दिसून येत आहे.
अशा स्थितीत, शंभू भक्तांना प्रश्न पडले आहे की यासाठी जबाबदार कोण? त्या संघटना का महानगरपालिका? शंभू भक्तांची ही इच्छा आहे की, पालिकेने लवकरात लवकर हे काम पुन्हा सुरू करून पूर्ण केले पाहिजे, जेणेकरून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक योग्य अवस्थेत करावे.