Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : शिवजंयतीनिमित्त मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:53 IST2025-02-18T18:49:16+5:302025-02-18T18:53:55+5:30
विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य वस्तीतील वाहतुकीत बुधवारी, आज (दि.१९) बदल करण्यात येत

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : शिवजंयतीनिमित्त मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल
- अंबादास गवंडी
पुणे : शिवजयंतीनिमित्त शहरातील मध्यवर्ती भागांतील लक्ष्मी रोड, शिवाजी रोडवरुन मिरवणुका निघतात. तसेच केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाकडून जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन केलेले आहे. यासाठी विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य वस्तीतील वाहतुकीत बुधवारी, आज (दि.१९) बदल करण्यात येत आहेत.
- जंगली महाराज रोडवरील वाहतूक संचेती हॉस्पिटल चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : इंजिनिअरिंग कॉलेज चौकातून येणारी वाहने डावीकडे कामगार पुतळा मार्गे, नेहरु रोड इच्छितस्थळी जाता येईल.
- फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वाहतूक खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय गेट, वीर चाफेकर चौकापर्यंत आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.
पर्यायी मार्ग : कोथरुड, कर्वे रोड, एसएनडीटी कॉर्नर मार्गे लॉ कॉलेज रोड, एसबी रोड मार्गे व नळस्टॉप चौक
येथून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
- टिळक रोडवरुन खंडोजी बाबा चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : अलका टॉकीज चौकातून शास्त्री रोडने सेनादत्त चौक, बालशिवाजी - नळस्टॉप मार्गे इच्छित स्थळी जातील.
- केळकर रोडवरुन झेड ब्रीजमार्गे डेक्कनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे बंद करण्यात येईल. पर्यायी मार्ग : गरुड गणपती चौक, टिळक चौक, शास्त्री रोडने इच्छित स्थळी जातील.
येथे असेल वाहन पार्किंग
१) खडकी, येरवडा आरटीओकडून येणाऱ्या वाहनांनी इंजिनिअरींग कॉलेज
चौकात वळून संगमवाडी येथे वाहने पार्किंग करावीत.
२) कर्वे रोड, कोथरुडकडून येणाऱ्या वाहनांनी अलका टॉकिज चौकात
डावीकडे वळून नदीपात्रात पार्किंग करावी.
३) स्वारगेट, हडपसर, दांडेकर पुलकडून येणारी वाहने सेनादत्त मार्गे अलका
टॉकिज चौकातून नदी पात्रातील पार्किंग येथे पार्क करतील.
४) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पाषाण, बाणेर या रोडने येणारी वाहने शिमला ऑफिस चौकात यू टर्न करुन ॲॅग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंडवर पार्क करतील.
जय शिवाजी जय भारत पदयात्रा
ही पदयात्रा इंजिनिअरिंग कॉलेज ग्राऊंड, स. गो. बर्वे चौक, मॉर्डन चौक, झाशी राणी चौक, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन महाविद्यालय मैदान अशी जाणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता व फर्ग्युसन कॉलेज रोडवरील वाहतूक सकाळी ७ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान बदल करण्यात येणार आहे.