छत्रपती शिवरायांचा इतिहास हा शौर्याचा, पराक्रमाचा आहेच, पण आदर्श राज्यकारभार, न्याय व्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:11 AM2021-04-01T04:11:06+5:302021-04-01T04:11:06+5:30

किल्ले शिवनेरीवर फाल्गुन वद्य तृतीया या तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत ...

Chhatrapati Shivaji's history is one of bravery and prowess, but ideal rule, justice and so on | छत्रपती शिवरायांचा इतिहास हा शौर्याचा, पराक्रमाचा आहेच, पण आदर्श राज्यकारभार, न्याय व्

छत्रपती शिवरायांचा इतिहास हा शौर्याचा, पराक्रमाचा आहेच, पण आदर्श राज्यकारभार, न्याय व्

googlenewsNext

किल्ले शिवनेरीवर फाल्गुन वद्य तृतीया या तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या उत्सवाचे हे ४१वे वर्ष होते. शिवनेरीची गडदेवता शिवाईमातेस सुनील रासने व संगीता रासने यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर बालशिवबांच्या शिल्पाची पालखीतून शिवाईमातेच्या मंदिरापासून शिवजन्मस्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.शिवजन्मस्थळात पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्म सोहळा संपन्न झाला. बालशिवबा व राजमाता जिजाऊ यांचे स्मारक असलेल्या शिवकुंज इमारतीसमोर ध्वजारोहण करण्यात आले.शिवकुंज स्मारकात झालेल्या धर्मसभेत शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष शाहिर हेमंत मावळे यांचे पोवाडे गायनाचा कार्यक्रम झाला.शिवनेरी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष मधुकर काजळे,उपाध्यक्ष गणेश टोकेकर, माजी पंचायत समिती सभापती संगीता वाघ, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, रमेश कर्पे ,संजय मुथा, संजय खत्री ,स्वराज्य मित्रमंडळाचे अध्यक्ष गोविंदराव हिंगे,चंद्रहास शोत्री ,राहुल लवांडे, सोनु पुराणिक, अशोक झनकर, अक्षय गायकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा राजमाता जिजाऊ पुरस्कार पिंपरी पेंढारच्या सरपंच सुरेखाताई वेठेकर यांना प्रदान करण्यात आला. कोरोनासंदर्भात नियमांचे पालन करून शिवजयंती सोहळा साजरा झाल्याने शिवभक्तांची संख्या मर्यादित होती.

किल्ले शिवनेरीवर बालशिवबांची पालखी वाहून नेताना सुनील रासने, शाहीर हेमंत मावळे, मधुकर काजळे व शिवप्रेमी.

किल्ले शिवनेरी येथील शिवजन्मस्थळात पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून शिवजन्म सोहळा साजरा करताना सुनील रासने, संगीता रासने, सुजाता काजळे, संगीता वाघ, शाहीर हेमंत मावळे, मधुकर काजळे आणि महिलावर्ग.

Web Title: Chhatrapati Shivaji's history is one of bravery and prowess, but ideal rule, justice and so on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.