सुरक्षा सप्ताहानिमित्त छत्रपतीच्या कामगारांनी घेतली सुरक्षा शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:11 AM2021-03-10T04:11:43+5:302021-03-10T04:11:43+5:30
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील प्रभारी कार्यकारी संचालक हणुमंत करवर, चीफ केमिस्ट सुनील पाटील,मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे स्टोअर ...
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील प्रभारी कार्यकारी संचालक हणुमंत करवर, चीफ केमिस्ट सुनील पाटील,मुख्य शेतकी अधिकारी जालिंदर शिंदे स्टोअर किपर नारायण जाधव, ऊस विकास अधिकारी प्रवीण कांबळे, सिव्हिल इंजिनियर तानाजी खराडे, कामगार कल्याण अधिकारी सपना ढगे, सर्व खाते प्रमुख गजानन कदम,दत्तात्रेय पिसे ,सतीश गावडे, दत्तात्रय निंबाळकर, बाबा सावंत, संजय मुळीक, तात्यासो चोपडे व कारखान्यातील कामगार उपस्थित होते.
याप्रसंगी कामगार कल्याण अधिकारीसपना ढगे यांनी सोशल डिस्टंसिंग व कोरोना संसर्गजन्य विषाणू आजारासंबंधीचे नियम पाळून कामगारांना सुरक्षिततेविषयी शपथ दिली. सुरक्षा शपथ कार्यक्रम कारखान्यात प्रथमच घेतल्याने कामगारांमध्ये या कार्यक्रमा विषयी विशेष उत्सुकता होती.
कामगारांना सुरक्षा शपथ देताना कामगार कल्याण अधिकारी कु. सपना ढगे