शेअर्स मूल्यवाढीबाबत ‘छत्रपती’च्या संचालकांनी भूमिका स्पष्ट करावी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:10 AM2021-05-20T04:10:29+5:302021-05-20T04:10:29+5:30
याबाबत जाचक यांनी कार्यकारी संचालकांना पत्र दिले आहे. त्यानुसार जाचक यांनी या निर्णयाला वैयक्तिक सभासद म्हणून व ...
याबाबत जाचक यांनी कार्यकारी संचालकांना पत्र दिले आहे. त्यानुसार जाचक यांनी या निर्णयाला वैयक्तिक सभासद म्हणून व शेतकरी कृती समितीचा अध्यक्ष म्हणून पूर्ण विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यशासनाने प्रति शेअर्सचे मूल्य रु. १५०००/- करणेबाबत परिपत्रक जारी केले आहे. हा निर्णय हा ऊस उत्पादकावर अन्याय करणारा आहे. श्रीछत्रपती स.सा.का.लि. भवानीनगरची शेअर्सची थकबाकी ही सुमारे सतरा कोटी रु. इतकी आहे. यामध्ये परत शेअर्सची किंमत वाढविणे सहकारी चळवळीला घातक आहे. शेअर्सचे पैसे कपात केले जातात म्हणून बरेचसे सभासद आपला ऊस दुसऱ्या कारखान्याला घालतात. त्यात नव्याने प्रतिशेअर्स ५०००/-ची वाढ केल्यावर यावधी निश्चितपणे उसाच्या उपलब्धतेबर अनिष्ट परिणाम होण्याची भीती जाचक यांनी व्यक्त केली आहे.
सहकारी साखर कारखाने एकरकमी एफ. आर. पी. देत नाहीत. उसाला वाजवी भाव देत नाही मग ही शेअर्सची वाढीव किमत कशासाठी असा देखील सवाल जाचक यांनी केला आहे. गळीत हंगाम सन २०२०-२०२१ मध्ये पुरवलेल्या उसाची प्रतिदन रु. ४००/- एफ. आर. पी. देणे बाकी आहे ती त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
———————————————————