पुण्यातील भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी सोडल्या कोंबड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:53 PM2021-08-24T12:53:01+5:302021-08-24T13:10:59+5:30
शिवसैनिकांचा संताप लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला बाहेर पोलीस बंदोबस्त
पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटू लागले आहेत. पुणे शहरातही शिवसैनिक आक्रमक झाले असून जंगली महाराज रस्त्यावरील भाजप कार्यालयात त्यांनी कोंबड्या सोडल्या आहेत. हीच राणेंची लायकी आल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
''आता तरी आम्ही पुण्यातल्या भाजप कार्यलयात घुसलो आहोत. वेळ आल्यास भारतीय जनता पार्टीचे ऑफिसही फोडून टाकू. असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे.''
शिवसैनिकांचा संताप लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला बाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी आज गुडलक चौकात कोंबड्यांसह आंदोलन केले असून डेक्कन जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना घडली. त्याचा राज्यभरात निषेध होत असून ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. या वक्तव्यामुळे पुण्यातील शिवसैनिक संतप्त झाले आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नारायण राणेंच्या निषेधार्थ पुण्यातील भाजपा कार्यालयात शिवसैनिकांनी सोडल्या कोंबड्या...https://t.co/CbvSFUjpi9#NarayanRanepic.twitter.com/kQ9oLRedWn
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021
शिवसैनिक रोहित कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
''मोदी साहेबांना विनंती आहे की असे उद्योग करणाऱ्यांना लवकरात लवकर मंत्रीपदावरून पाया उतार करावा. राज्याच्या मुख्यमंत्री विरोधात भाषण केले. शासनाने कठोर कारवाई करावी. असे कार्यकर्ते म्हणाले आहेत.''
''भाजपने खासदारची तुकडा टाकला त्यावर तो बडबड करतोय,तो स्वतःच्या मतदार संघात निवडून येऊ शकत नाही, हीच त्याची लायकी आहे. केंदीय मंत्र्याने असे वक्तव्य करणं शोभत नाही. राणेंवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.''