मुख्य आरोग्य अधिकारी पद भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:31 AM2017-08-02T03:31:41+5:302017-08-02T03:31:41+5:30
पुणे महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी यांचे पद लवकरच भरण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. औषध पुरवठादाराची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याने याची चौकशी करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
पुणे : पुणे महापालिकेतील मुख्य आरोग्य अधिकारी यांचे पद लवकरच भरण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. औषध पुरवठादाराची निवड पारदर्शक पद्धतीने करण्यात आल्याने याची चौकशी करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
विजय काळे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. औषध खरेदी; तसेच सोनोग्राफी मशिनच्या खरेदीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
औषध खरेदीची चौकशी करण्याची गरज नसल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सोनोग्राफी मशिनच्या किमतीत प्रिंटर, सॉफ्टवेअर, वार्षिक देखभालीचा खर्च यांचाही समावेश आहे. त्यामुळे किंमत
जास्त वाटते. तरीदेखील हे मूल्य योग्य आहे की नाही, याची पडताळणी करण्यात येईल.
मेधा कुलकर्णी यांनी डॉक्टरांना कचºयाचे कंटेनर उचलावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करताच अशी वेळ डॉक्टरांवर येऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.