आठ तास वीजपुरवठ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
By admin | Published: April 14, 2016 02:06 AM2016-04-14T02:06:51+5:302016-04-14T02:06:51+5:30
उजनी जलाशयातील पाण्याच्या परिस्थितीचा अहवाल विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागाकडून मागवण्यात येईल. त्याचा अभ्यास करून उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांना आठ तास वीजपुरवठा
इंदापूर : उजनी जलाशयातील पाण्याच्या परिस्थितीचा अहवाल विभागीय आयुक्त व जलसंपदा विभागाकडून मागवण्यात येईल. त्याचा अभ्यास करून उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतीपंपांना आठ तास वीजपुरवठा करण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील उजनी धरण संवर्धन समितीच्या शिष्टमंडळास दिले.
उजनी पाणलोट क्षेत्रातील वीजकपातीच्या निर्णयाचा
फेरविचार करावा, या मागणीसाठी हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना वीजकपातीमुळे ओढवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.
उजनी धरण संवर्धन समितीचे अध्यक्ष अंकुश पाडुळे, मयूरसिंह पाटील, नगराध्यक्ष अशोक इजगुडे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष गोरख शिंदे, बाळासाहेब मोरे, रघुनाथ राऊत, भाऊसाहेब चोरमले व इतर प्रमुख कार्यकर्त्यांचा शिष्टमंडळात समावेश होता. (वार्ताहर)
पाच तास वीज दिली, तरी ती पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे
आठ तास पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, असा आग्रह हर्षवर्धन पाटील यांनी धरला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी वरील आश्वासन दिले.