'अपघात नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला?'; एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:14 AM2022-11-21T11:14:32+5:302022-11-21T11:18:38+5:30

सदर घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहेत.

Chief Minister Eknath Shinde has ordered an inquiry into the horrific accident that took place near Navale Bridge | 'अपघात नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला?'; एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

'अपघात नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला?'; एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश

googlenewsNext

सातारा-मुंबई महामार्गावर नऱ्हे स्मशानभूमीवरील बाजूला असलेल्या सेल्फी पॉईंटजवळ एका ट्रकने एका पाठोपाठ ४८ वाहनांना उडविले. ही दुर्घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणाचाही बळी गेला नाही. मात्र दहा जण जखमी झाले आहेत. या भरधाव ट्रकने पुढे असलेल्या वाहनांना एका पाठोपाठ धडक देत सुमारे ४०० ते ५०० मीटरच्या अंतरातील ४८ हून अधिक वाहने चिरडली. 

सदर घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून याबाबत चौकशीचे आदेशही दिले आहेत. एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, पुण्यातील नवले ब्रिज येथे आज  रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश दिले आहे.

या अपघातातील जखमींना योग्य ते उपचार मिळण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देखील स्थानिक प्रशासनाला दिल्या असून या अपघातामुळे सदर भागात झालेल्या वाहतूक कोंडी दूर करून वाहनधारकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देखील वाहतूक पोलिसांना दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

दरम्यान, अपघातग्रस्त वाहने उलटी-सुलटी पडली असल्याने रस्त्यावर पेट्रोल, डिझेल आणि ऑईलचे पाट वाहत होते, तर कार्सचे बॉनेट, बंपर, व्हीलकव्हर यासह कांचाचा खच पडला होता. यासाठी अग्निशामक दलाने रासायनिक साबणाच्या फेस रस्तावर टाकन रस्ता धऊन काढला.

पोलीस तत्काळ हजर

सुमारे दहा मिनिटांमध्ये पोलिस आणि रुग्णवाहिका आल्या. त्यांनी मदत देऊ केली. तोपर्यंत माझ्या नोतवाईकाना, कुटुंबियांना आम्ही बोलावले होते. ते ही घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने आम्ही ट्रकजवळ गेलो तेव्हा ट्रकचाकल पळून गेल्याचे सांगण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Chief Minister Eknath Shinde has ordered an inquiry into the horrific accident that took place near Navale Bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.