केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आटोपले भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 09:02 PM2018-05-01T21:02:36+5:302018-05-01T21:02:36+5:30

देशातील पहिल्या फ्लोटिंग रिसिफिकेशन प्रकल्पाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे झाले. मात्र या उपक्रमाला केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या वाजत गाजत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासह कोकणात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही.

Chief Minister Fadnavis News | केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आटोपले भाषण

केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आटोपले भाषण

Next

रत्नागिरी - देशातील पहिल्या फ्लोटिंग रिसिफिकेशन प्रकल्पाचे उदघाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथे झाले. मात्र या उपक्रमाला केवळ शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आटोपते घेतले. सध्या वाजत गाजत असलेल्या रिफायनरी प्रकल्पासह कोकणात येणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांबाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही.
हिरानंदानी ग्रुपच्या एच एनर्जी कंपनीने जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीसोबत फ्लोटींग रिसिफिकेशन प्रकल्प सुरू केला आहे. त्यामुळे आता सीएनजी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.
या उपक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री रिफायनरीविषयी काही बोलतील अपेक्षित धरले जात होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी केवळ या उपक्रमाला शुभेच्छा देत भाषण आवरले. कार्यक्रम संपल्यानंतरही पत्रकारांना अक्षरशः टाळूनच मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईकडे रवाना झाले.

Web Title: Chief Minister Fadnavis News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.