बारा सदस्यांच्या निवडीसाठी मुख्यमंत्री, मी राज्यपालांना पुन्हा भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:16 AM2021-08-21T04:16:14+5:302021-08-21T04:16:14+5:30
पुणे : दोन दिवसांपूर्वीच एका चहापान कार्यक्रमात १२ सदस्यांच्या नियुक्तीचा विषय निघाला होता. तेव्हा राज्यपालांनी येऊन भेटा असे ...
पुणे : दोन दिवसांपूर्वीच एका चहापान कार्यक्रमात १२ सदस्यांच्या नियुक्तीचा विषय निघाला होता. तेव्हा राज्यपालांनी येऊन भेटा असे म्हणाले, तेव्ही मी आणि मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा राज्यपालांना भेटणार आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विधानभवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. राज्य सरकार माझ्याकडे १२ सदस्यांच्या नियुक्तीचा आग्रह धरत नाही. तुम्ही का आग्रह धरता? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस नेत्याला केला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या मुद्द्यावरून राज्यपालांवर टीका केली होती.
-------
आम्ही पुरोगामी विचारसरणीचे; हातामध्ये गंडा-दोरे बांधत नाही
आम्ही पुरोगामी विचारसरणीला मानतो म्हणून आम्ही हातामध्ये गंडादोरे घालत नाही काही, जण अजूनही अशा अंधश्रद्धेच्या बाबींना बळी पडत आहेत, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केले.
विधानभवन येथे आयोजित बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यात, देशात आपल्याला अनेक भोंदूगिरी बाबा दिसतात नागरिक त्याला बळी पडत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिलेल्या आहेत. चुकीच्या प्रकारे कोणी नागरिकांची फसवणूक करत असेल त्याला पाठीशी घालण्याची गरज नाही. नरेंद्र दाभोलकर यांच्या बरोबर चर्चा करून जादुटोणा कायदा लागू केला. आम्ही हातामध्ये गंडा- दोरा कधी घालत नाही. अशाप्रकारच्या जादूटोण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढत असल्या तरी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पवार यांनी सांगितले.