मुख्यमंत्र्यांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास
By admin | Published: April 20, 2017 07:03 AM2017-04-20T07:03:41+5:302017-04-20T07:03:41+5:30
महापालिका शिक्षण मंडळाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर शाळेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-लर्निंगचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांचा
पुणे : महापालिका शिक्षण मंडळाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर शाळेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ई-लर्निंगचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांचा तास घेतला. छत्रपती शाहू महाराजांवरील पाठ फडणवीस यांनी या वेळी विद्यार्थ्यांना शिकविला.
पौड फाटा येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यामंदिर या मुलींच्या शाळेतील ई-लर्निंग प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. या वेळी आमदार मेधा कुलकर्णी, प्रभारी आयुक्त राजेंद्र जगताप, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
खुद्द मुख्यमंत्री वर्गात आल्याने विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला. ई-लर्निंग प्रकल्पाचे उद्घाटन झाल्यानंतर त्याद्वारे विद्यार्थ्यांना कसे शिकविले जाईल, याचे प्रात्याक्षिक या वेळी दाखविण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीही छत्रपती शाहू महाराजांवरील पाठाचा काही भाग विद्यार्थ्यांना या वेळी शिकविला.
महापालिकेच्या वतीने शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या उपकमांची माहिती या वेळी त्यांना देण्यात आली. या उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी मन:पूर्वक कौतुक केले.