चिखलीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:44+5:302021-01-19T04:11:44+5:30

चिखली (ता. इंदापूर) ग्रामपंचायत निवडणूक निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सिध्दनाथ बहुजन विकास पॅनलने विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व मिळविले.एकूण ...

Chikhali NCP's undisputed dominance | चिखलीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

चिखलीत राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व

Next

चिखली (ता. इंदापूर) ग्रामपंचायत निवडणूक निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सिध्दनाथ बहुजन विकास पॅनलने विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व मिळविले.एकूण सात जागेसाठी निवडणूक लागली होती.त्यामध्ये सहा जागा जिंकत राष्ट्रवादीने विजय मिळवला.

राष्ट्रवादी पुरस्कृत सिध्दनाथ बहुजन विकास पॅनेल व भाजप पुरस्कृत जयभवानी जनसेवा पॅनेल यांच्यामध्ये ७ जागेसाठी लढत झाली.

विजयी उमेदवार व मिळालेली मते सिध्दनाथ बहुजन विकास पॅनेल प्रभाग क्रमांक एक - संदीप शिवाजी गायकवाड ( २३६) हर्षदा राहुल पांढरे ( २५३) सुप्रिया विनोद अर्जुन ( २३८ )

प्रभाग क्रमांक २

उत्तम बबन खोमणे (१७०) मंगल विलास शेंडगे (१६९) प्रभाग क्रमांक ३

वैशाली सोमनाथ अर्जुन ( १७७ )

भाजपा पुरस्कृत जयभवानी जनसेवा पॅनेलच्या प्रभाग क्र ३ मधील विजयी उमेदवार

मीनाक्षी महादेव मोरे ( १६८)

चिखली ग्रामपंचायतच्या निवडणूकसाठी राष्ट्रवादी चे पॅनल प्रमुख नारायण अर्जुन यांच्या नेतृत्वाखाली व महादेव कवळे ,बाळासाहेब रूपनवर , दादासो डोंबाळे , बबन खोमणे, राजू खरात , पोपट दराडे,उध्दव अर्जुन, बाबूराव अर्जुन, रामदास अर्जुन, महादेव अर्जुन, गोविंद डोंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली ग्रामस्थांच्या सहकार्याने यश मिळाले असल्याचे विजयी उमेदवारानी सांगितले.

--

फोटो फोटो ओळ - चिखली ता. इंदापूर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर विजयी उमेदवार

Web Title: Chikhali NCP's undisputed dominance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.