पाबळ रस्त्यालगत वसाहतीमध्ये चिकुनगुनियासदृश आजार

By Admin | Published: June 28, 2017 03:56 AM2017-06-28T03:56:22+5:302017-06-28T03:56:22+5:30

पाबळ रोडलगत इंद्रायणी सोसायटी व परिसरात चिकुन गुनियासदृश विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. जवळपास

Chikkununia diseases in colonies by the highway | पाबळ रस्त्यालगत वसाहतीमध्ये चिकुनगुनियासदृश आजार

पाबळ रस्त्यालगत वसाहतीमध्ये चिकुनगुनियासदृश आजार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोेमेश्वरनगर : वयाच्या तेराव्या वर्षीपासून राजश्रीने ध्यास घेतला तो विठ्ठलाचा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आळंदी ते पंढरपूर अशा २५० किलोमीटर रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्याची तिची अविरत सेवा सुरू आहे. राजश्रीच्या या सेवेमुळे दररोज रांगोळीच्या पायघड्यांनी माऊलींची पंढरीची वाट सजत आहे.
राजश्री राजेंद्र जुन्नरकर असे या १९ वर्षीय मुलीचे नाव आहे. वडील राजेंद्र हे फर्निचरचे काम करतात, तर आई मनीषा ही गृहिणी आहे. तिला एक भाऊ तर एक बहीणही आहे. जुन्नरकर कुटुंब मूळचे जुन्नर तालुक्यातील हिवरे गावचे असून व्यवसायानिमित्त वडील भोसरीमध्ये स्थायिक झाले. तिला लहानपणापासूनच वेगवेगळी चित्रे काढण्याची आवड होती. तिची ही आवड तिच्या आईवडिलांनी ओळखली आणि तिला रांगोळी आणि मेहंदी काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. वडील तिला वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नेत होते.
वयाच्या तेराव्या वर्षी तिने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये आळंदी ते पंढरपूर अशा रस्त्यावर रांगोळी काढण्यास सुरुवात केली. पहिल्या वर्षी तिला रांगोळीसाठी आर्थिक चणचण जाणवली. या २५० किलोमीटर रस्त्यावर रांगोळी काढण्यासाठी १० पोती कलर तर ८० पोती रांगोळी लागत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च जुन्नरकर कुटुंबीयांना परवडणारा नव्हता. पण म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग. याप्रमाणे तिची कला पाहून अनेकांनी तिला रांगोळीच्या स्वरूपात
मदत करण्यास सुरुवात केली. यामध्ये सातारचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश लांडगे, संजय वाबळे, संजय गायकवाड, वैकुंठ कुंभार, खासदार धनंजय महाडिक, सचिन लांडगे, शाम गवळी, अजित गव्हाणे यांनी तिचा रांगोळीचा खर्च उचलला. दरवर्षी तिला ही मदत मिळते. त्यामुळे गेल्या सहा वर्षांपासून राजश्रीचे सर्व रस्त्याने रांगोळीच्या पायघड्या घालण्याचे व्रत आजही सुरू आहे आणि ते शेवटपर्यंत अखंडरीत्या सुरू ठेवणार असल्याचे राजश्री सांगते.

Web Title: Chikkununia diseases in colonies by the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.