शिरूरच्या पूर्व भागामध्ये चिकुनगुणियाची साथ नागरिकांच्या घरामध्ये अळ्यांचे आगर : डॉ. मंजूषा सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:33+5:302021-09-23T04:12:33+5:30

एका दिवसात गावात सरासरी रोज ५ ते १० रुग्ण आढळून येत असून, आत्तापर्यंत अनेकांना याची बाधा झाली ...

Chikungunya in the eastern part of Shirur. Manjusha Satpute | शिरूरच्या पूर्व भागामध्ये चिकुनगुणियाची साथ नागरिकांच्या घरामध्ये अळ्यांचे आगर : डॉ. मंजूषा सातपुते

शिरूरच्या पूर्व भागामध्ये चिकुनगुणियाची साथ नागरिकांच्या घरामध्ये अळ्यांचे आगर : डॉ. मंजूषा सातपुते

Next

एका दिवसात गावात सरासरी रोज ५ ते १० रुग्ण आढळून येत असून, आत्तापर्यंत अनेकांना याची बाधा झाली आहे. या आजाराला सामोरे जाण्यासाठी रुग्णांना खासगी दवाखान्याचा रस्ता धरण्याची वेळ आली असून, दवाखान्याचा न परवडणारा खर्च सोसावा लागत आहे. एका रुग्णास सरासरी तीन दिवसांच्या सलाईनसह उपचारासाठी तीन ते चार हजार रुपये खर्च येत आहे.

याबबात डॉ. सातपुते यांनी सांगितले की, आरोग्य विभागाकडून काही घरामध्ये तपासणी करण्यात आली, त्यावेळी नागरिकांच्या घरामध्येच अळ्यांची पैदास होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घराघरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील पाणीसाठे तपासून ते कोरडे केले पाहिजेत, ते होत नाही. संपूर्ण महाराष्ट्राला डेंग्यूचा विळखा आहे. एक डास ३-४ किलोमीटर जाऊन बाधा पोहोचू शकतो. त्यासाठी आठवड्यातून एकदिवस कोरडा दिवस पाळण्याची गरज आहे. नागरिकांनी तुंबलेली गटारे मोकळी करून द्यावीत. डबडी, फुटक्या बादल्या, टायर यांमधील साचलेले पाणी मोकळे करावे.

Web Title: Chikungunya in the eastern part of Shirur. Manjusha Satpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.