बालकमंदिरच्या विद्याथ्र्याचा जीव मुठीत
By admin | Published: December 10, 2014 11:14 PM2014-12-10T23:14:39+5:302014-12-10T23:14:39+5:30
बारामती शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्यावरील महात्मा गांधी बालक मंदिर परिसरात शाळा सुटल्यानंतर रोजच मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे.
Next
बारामती : बारामती शहरातील छत्रपती शिवाजी रस्त्यावरील महात्मा गांधी बालक मंदिर परिसरात शाळा सुटल्यानंतर रोजच मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. या वाहतुकीच्या कोंडीमधूनच विद्याथ्र्याना आणि पालकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या कालावधीत या ठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
भिगवण रस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शारदा प्रांगण येथील नगरपरिषदेची शाळा आदी प्रमुख शाळा भिगवण चौकानजीकच आहेत. त्यामुळे 5 ते 5.3क् च्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर भिगवण चौक ते महात्मा गांधी बालक मंदिर शाळा परिसरार्पयत मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते.
4शहरातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित शाळा म्हणून महात्मा गांधी बालक मंदिर शाळेचा नावलौकिक आहे. म्हणूनच या शाळेमध्ये पाल्याचा प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल असतो. परिणामी शाळेत विद्यार्थीसंख्या जास्त आहे. या शाळेत पहिली ते चौथी असे प्राथमिक वर्ग आहेत. शाळा भरण्याच्या सुमारास आणि शाळा सुटण्याच्या सुमारास या ठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी होत असते. तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे या कोंडीत भरच पडते. मागील दोन आठवडय़ांपूर्वी शहरातील बेशिस्त वाहनचालतकांवर शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता; परंतु काही दिवसातच तो थंडावलाही.
4वाहतुकीच्या कोंडीमुळे रस्ता ओलांडताना विद्यार्थी भांबावलेले असतात. त्यातच काही बेशिस्त वाहनचालक वेगात वाहने चालवतात, कर्कश्य ‘हॉर्न’ वाजवतात. त्यामुळे विद्याथ्र्याच्या गोंधळात आणखीनच भर पडते. त्यामुळे विद्याथ्र्याना जीव मुठीत धरूनच रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे शाळा भराण्याच्या सुमारास आणि सुटण्याच्या सुमारास या ठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.