आई-वडील रागवल्याने बालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:23+5:302020-12-25T04:10:23+5:30

पिंपळे गावातील कृष्णा भगवान चोरमले (वय १३) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सातवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णाने घरातील ...

Child commits suicide due to anger of parents | आई-वडील रागवल्याने बालकाची आत्महत्या

आई-वडील रागवल्याने बालकाची आत्महत्या

Next

पिंपळे गावातील कृष्णा भगवान चोरमले (वय १३) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सातवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णाने घरातील आईच्या साडीने कॉटवर उभे राहत घरातील लोखंडी अँगलला गळफास घेतला. कृष्णा बुधवारी गावातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर बसून इंदापूरला गेला होता. याची माहिती कोणालाही नव्हती. त्यामुळे घरातल्यांनी त्याला चिडून याची विचारणा केली. याचाच राग मनात धरून कृष्णाने आई वडील कामाला गेल्यानंतर हे कृत्य केले. कृष्णा हा चोरमले कुटुंबासाठी एकुलता एक मुलगा होता. कृष्णाची आई शेतीच्या कामासाठी बाहेर गेली होती तर वडील ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी बाहेर गेले होते. या प्रकरणी अमित सदाशिव चोरमले यांनी भिगवण पोलीस ठाण्यात खबर दिली. घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिक्षण घेत असताना गावातील पद्मावती मंदिरात ढोल वाजवून पैसे कमावणारा कृष्णा अचानक गेल्याने पिंपळे गावकरी हळहळ व्यक्त करीत होते.

Web Title: Child commits suicide due to anger of parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.