पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा करुण अंत !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 03:57 PM2019-05-25T15:57:29+5:302019-05-25T15:58:33+5:30
पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याजवळील देहू इथे घडली आहे. या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
पुणे (देहू) :पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुण्याजवळील देहू इथे घडली आहे. या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
वेदांत गौतम गायकवाड ( वय १९ महीने, रा. विठ्ठलवाड़ी ,देहूगाव) असे मृत बालकाचे नाव आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठलवाडी भागात राहणाऱ्या वेदांतच्या घरात त्याच्यासह चार व्यक्ती राहत होत्या. आई, वडील आणि मोठ्या बहिणीसोबत राहत असताना ही घटना घडली. त्याचे आईवडील मजुरी करतात तर त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. त्यांच्या घरी सध्या गॅस ऐवजी स्टोव्हचा वापर केला जातो. हा स्टोव्ह पेटवण्यासाठी डिझेलचा वापर केला जात होता. डिझेलची जमिनीवर पडलेली बाटली त्याचे पाणी समजून तोंडाला लावली. काही वेळाने त्याला उलट्या सुरु झाला. त्यावेळी त्याने डोळे पांढरे केले. ही गोष्ट वेदांतच्या आईच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा अंत झाला. या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.