उद्योगनगरीत राबताहेत बालमजूर

By admin | Published: November 15, 2016 03:22 AM2016-11-15T03:22:06+5:302016-11-15T03:22:06+5:30

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून शहरात विविध ठिकाणी सोमवारी साजरी झाली़याच दिवशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी उद्योगनगरीत केलेल्या

Child labor in industry | उद्योगनगरीत राबताहेत बालमजूर

उद्योगनगरीत राबताहेत बालमजूर

Next

पिंपरी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून शहरात विविध ठिकाणी सोमवारी साजरी झाली़याच दिवशी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी उद्योगनगरीत केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये लघु उद्योगांच्या ठिकाणी बालमजूर राबत असल्याचे विदारक चित्र दिसले़ राज्यातील सर्वांत मोठी औद्योगिकनगरी असल्याने शहरात अनेक राज्यांतून कामगार दाखल झाले आहेत़ अतिशय तुटपुंज्या पगारावर विविध औद्योगिक कंपनीत पती-पत्नी काम करीत असतात़ मात्र, महागाई मोठ्या प्रमाणावर असल्याने कौटुुंबिक गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्यासोबत १४ वर्षांखालील असलेल्या मुलगा किंवा मुलीला काम करण्यासाठी ते परावृत्त करीत आहेत़
केंद्र व राज्य शासनातर्फे बालकांची शैक्षणिक व सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. शिवाय अनेक स्वयंसेवी संस्था व संघटना बालकांच्या कल्याणासाठी काम करीत आहेत़ मात्र, तरीही केवळ कुटुंबाची बिकट अर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे कुटुंबाला हातभार म्हणून बालकांना शाळे ऐवजी मंजुरी करावी लागत असल्याचे वास्तव समोर आले. शहरातील कुदळवाडी परिसरात गॅरेजच्या दुकानात, हॉटेलमध्ये, मासे विक्री, नारळपाणी विक्री करताना, सायकल दुकान, किराणा माल दुकानांमध्ये बालकामगार आढळून आले़ हॉटेल व माशांचा बाजार या ठिकाणी १० वय वर्षे असणारी मुले काम करीत होती़

Web Title: Child labor in industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.