उरळी कांचन येथे कॅन्सर पीडित आईला भेटल्यानंतर मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:44 PM2019-04-18T19:44:39+5:302019-04-18T19:45:11+5:30
आपल्या कॅन्सर पीडित आईला भेटण्यासाठी बुधवार (दि.१७ ) रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये गेला होता.
उरळी कांचन : कॅन्सर पीडित आईला रुग्णालयात भेटून आल्यानंतर मुलाने साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना उरुळी कांचन (ता.हवेली ) येथील दात्तार कॉलणीत बुधवार (दि.१७) रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली आहे.
विजय गोकुल कटके ( वय -३० रा. दातार कॉलनी , उरुळी कांचन , ता.हवेली , जि.पुणे ) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. विजय याची आई पोटाच्या कॅन्सरने आजारी असल्याने त्यांना मंगळवार दि. १६ रोजी पुण्यातील काशिबाई नवले हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले होते . त्यांनंतर विजय हा आपल्या कॅन्सर पीडित आईला भेटण्यासाठी बुधवार (दि.१७ ) रोजी सकाळी १० वाजता पुण्यातील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये गेला होता. साधारण दु.४ च्या सुमारास घरी परतल्यानंतर चुलत भाऊ श्रीनाथ यांच्याशी तब्बेतीची विचारपुस केल्यानंतर वडील दवाखान्यात आईजवळ थांबले असल्याचे भाऊ श्रीनाथला सांगून राहत्या घरात थांबला होता.
रात्री ९ च्या सुमारास राहत्या घरात साडीने गळफास घेऊन लटकल्याचा अवस्थेत आढळल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार अमोल भोसले करत आहे.