मोबाईलमुळे बालपण वेगळ्या मार्गाने जात आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:29 AM2020-12-11T04:29:29+5:302020-12-11T04:29:29+5:30
--- उरुळी कांचन : बदलत्या मोबाईल संस्कृती बरोबर लहान मुलांचे छंद देखील बदलत चालले आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे ...
---
उरुळी कांचन : बदलत्या मोबाईल संस्कृती बरोबर लहान मुलांचे छंद देखील बदलत चालले आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचे बालपण वेगळ्या मार्गाने जात आहे. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्य पूर्वजांचा आणि गडकिल्यांच्या इतिहासाचा अभ्यास होणे, त्याची माहिती असणे ही काळाची गरज बनली आहे असे प्रतिपादन शिवसेना कार्यकर्ते व ग्रामपंचायतचे माजी सदस्य नितीन कांचन यांनी केले.
संघर्ष प्रतिष्ठान उरुळी कांचन यांच्या माध्यमातून गेल्या ६ वर्षांपासून दिवाळीला दर्जेदार किल्ले स्पर्धा आयोजित केली जात आहे. या वर्षी २८ किल्लेदारांनी अत्यंत उत्कृष्ट अशा किल्यांच्या प्रतिकृती बनवून भाग घेतला होता, त्याचा आज बक्षीस वितरण सोहोळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप , युवा नेते निखिल कांचन, पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष सारिक सय्यद, सचिन कांचन, संदीप कांचन, अनिरुद्ध पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप कांचन यांनी तर सूत्रसंचालन अनिरुद्ध पवार यांनी केले. सारिक सय्यद यांनी आभार मानले
--
स्पर्धेचा निकाल असा
प्रथम -रणझुंजार ट्रेकर्स ग्रुप, सोरतापवाडी (राजगड प्रतिकृती) द्वितीय - छत्रपती ग्रुप, तुपेवस्ती, तृतिय - अतुल कोतवाल, दत्तवाडी, चतुर्थ (विभागून) - साहिल तानाजी खलसे पांढरस्थळ वस्ती, केदार नितीन जाधव, तुपेवस्तीॉ. पाचवा - प्रतीक भोंगळे, तुपेवस्ती.