‘बालदिना’चा मुलांनी लुटला आनंद

By admin | Published: November 16, 2014 12:34 AM2014-11-16T00:34:37+5:302014-11-16T00:34:37+5:30

प्रतीकनगर येथील माजी सैनिकनगरमधील अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने ‘बालदिना’निमित्त खडकीतील स्पर्श बालग्राम संस्थेतील एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.

Children of 'Baldina' enjoy looting | ‘बालदिना’चा मुलांनी लुटला आनंद

‘बालदिना’चा मुलांनी लुटला आनंद

Next
1 येरवडा : प्रतीकनगर येथील माजी सैनिकनगरमधील अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने ‘बालदिना’निमित्त खडकीतील स्पर्श बालग्राम संस्थेतील एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. 
2 या वेळी मंडळाच्या वतीने संस्थेला 7 हजारांचा धनादेशही देण्यात आला. रणवाद्य ढोल-पथकाचे गौरव रणपिसे, मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव, भारत डावरे, समाधान वाघमारे, राजेश खालसोडे, राजेंद्र राजपुरोहित अक्षय ढाणो, असीम अन्सारी यांसह अष्टविनायक वाद्य पथकाचे कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमासाठी डॉ. सादिक खान यांचे सहकार्य लाभले. 
 
‘स्वच्छता अभियान’ 
फुरसुंगी : येथील अंगणवाडी कार्यकत्र्यानी ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत वडकीनाला येथील पालखीस्थळाचा परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात फुरसुंगी विभागातील सर्व अंगणवाडी मदतनीस, अंगणवाडीचे विद्यार्थी व प्राथमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्र येऊन स्वच्छतेची शपथ घेतली. अंगणवाडी पर्यवेक्षिका संगीता घोडेराव यांनी आयोजन केले होते.
 
वस्तीतील विद्याथ्र्यासाठी चित्नकला स्पर्धा
सहकारनगर : ‘बालदिना’निमित्त  वस्तीतील आणि वसाहतीमध्ये राहणा:या विद्याथ्र्यासाठी चित्नकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस उपायुक्तपरिमंडळ दोनचे डॉ. सुधाकर पठारे, गिरीष चरवड, डॉ. नितीन बोरा, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, नितीन करंदीकर, मुख्याध्यापिका दीप्ती कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा स्मिता जाधव उपस्थित होते. या स्पर्धेत 1क्क् विद्यार्थी सहभागी झाले. विद्याथ्र्याना रंगपेटी, खाऊ देण्यात आला. 
 
डोंबारी मुलांचा मेळावा 
हडपसर :  एरवी रस्त्यावर खेळ दाखवून समाजाचे मनोरंजन करणा:या डोंबारी समाजाच्या मुलांना स्वत:साठी आनंद लुटता येत नाही. याही मुलांना आनंद  लुटता यावा म्हणून ‘बालदिना’ निमित्त ‘डोंबारी मुलांचा बाल मेळावा’ रामटेकडी येथे आयोजित केला होता.  मानवी युवा विकास संस्था, लक्ष्य ग्रुप  आणि माय पुणो असोसिएनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुरेश जैन, ललित ओसवाल, संकेत ओसवाल, पवन मंत्नी, माधवी गुप्ते, मनीषा वाघमारे, नितीन मुथा, नीलेश शेठ उपस्थित होते. 
 
‘बालदिन’ सप्ताह
भारती विद्यापीठाच्या शंकरराव मोरे विद्यालयामध्ये ‘बालदिन’ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. विद्यालयामध्ये विद्याथ्र्यानी शाळेचा परिसर व आपले वर्ग स्वच्छ केले. कलाशिक्षक जगदिश कुंभार व श्रद्धा कुमटेकर यांनी केले. मुख्याध्यापक के . एच. पाटील, पयर्वेक्षक के . व्ही. महाडिक, डी. जे. मुलाणी उपस्थित होते.
सावंत संस्थेमध्ये ‘स्वच्छता अभियान’
हडपसर : जयवंतराव सावंत इन्सिटीटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च संस्थेमध्ये मारुतीराव काळे विद्यालय या महापालिकेच्या विद्यार्थिनीसाठी ‘स्वच्छता अभियाना’चे आयोजन करण्यात आले. संचालिका डॅा. अनिता खडके यांनी विद्याथ्र्याना हात स्वच्छ ठेवा व शरीर निरोगी ठेवा, हा संदेश दिला.  
कार्यक्रमासाठी डॉ. बुगडे, डॉ. संजय सावंत आदी उपस्थित होते. प्रा. चंद्रकांत हो, प्रा. अभिषेक, प्रा. ज्योती मेश्रम, प्रा. प्रज्ञा, प्रा. वैशाली निकम, प्रा. विनय भालेराव, प्रा. अक्षय गणबोटे  यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. अमोल निकम यांनी आभार मानले.
विद्याथ्र्याना कपडेवाटप
फुरसुंगी :  भेकराईनगर येथील एकनाथराव हरपळे गुरुजी महिला नागरी पतसंस्था आणि हरपळे हॉस्पिटलच्या वतीने कचरा डेपो आणि बांधकामावरील मजुरांच्या मुलांची स्वच्छता करून कपडे आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. उज्ज्वला हरपळे व हॉस्पिटलचे डॉ. बाळासाहेब हरपळे यांनी स्वच्छता अभियान आणि बालदिनाच्या निमित्ताने हा वेगळा उपक्रम राबविला. पतसंस्थेच्या संचालिका जयमाला कवठेकर, संजीवनी देवकर, प्रतीक कवठेकर आदींसह मुलांचे पालक उपस्थित होते. 
प्रगती स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा
धानोरी : प्रगती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बालदिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आली. प्रशालेच्या मुख्याध्यापिका प्रीती माने, प्रशालेचे सचिव किशोर माने यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्ताने प्रशालेतील विद्याथ्र्यानी वेगवेगळे पारंपरिक व आकर्षक पोशाख परिधान केले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याविषयी, तसेच बालदिनाचे महत्त्व विद्याथ्र्याना अश्विनी दाणी यांनी सांगितले.  
मुलांना खाऊवाटप
येरवडा : ‘बालदिना’चे औचित्य साधून लोहगावमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील खांदवे-पाटील यांनी अनाथाश्रमात खाऊवाटप केले. या वेळी मोहनराव ¨शंदे-सरकार, मल्हारी खांदवे, नवनाथ मासुळकर, गणोश खांदवे, दिशा संस्थेच्या पौर्णिमा गादिया उपस्थित होते. 
विद्याथ्र्याना साहित्याचे वाटप
सहकारनगर : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पुणो शहर युवक काँग्रेसतर्फे बालदिन कार्यक्रम घेण्यात आला. पर्वती येथील गुलाबबाई कटारिया प्राथमिक विद्यामंदिरात शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. 
या वेळी मुख्याध्यापिका गोरे यांनी पं. नेहरू यांच्या जीवनाचा व त्यांच्या कार्याचा परिचय विद्याथ्र्याना करून दिली. 
कार्यक्रमाचे आयोजन कार्यकारी अध्यक्ष विकास लांडगे यांनी केले होते. या वेळी संतोष पाटोळे, मंथन शेलार, नाना डाकले, तुषार खलाटे, ऋत्विक गरूड उपस्थित होते.
 

 

Web Title: Children of 'Baldina' enjoy looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.