नरकयातनेतील मुलांना ‘पन्ना’मुळे ‘प्रकाशाची वाट’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:30 AM2019-03-08T01:30:19+5:302019-03-08T01:30:37+5:30
देहविक्री करणाऱ्या महिला तसेच तृतीय पंथीय यांच्या मुलांना मरणयातना भोगाव्या लागू नये यासाठी २० वर्षांपासून बी. पन्ना यांनी प्रयत्न करीत आहेत.
- शब्दाली जवळकोटे-प्रधान
पुणे : देहविक्री करणाऱ्या महिला तसेच तृतीय पंथीय यांच्या मुलांना मरणयातना भोगाव्या लागू नये यासाठी २० वर्षांपासून बी. पन्ना यांनी प्रयत्न करीत आहेत. या मुलांना अंधाऱ्या खोलीतून प्रकाशाची वाट त्या दाखवत असून, आज ही मुले उच्चशिक्षित होऊन सन्मानाने जीवन जगत आहते.
शरिरात बदल झाल्यामुळे पन्ना यांना १३ व्या वर्षीच आई वडिलांनी टाकून दिले. यामुळे इच्छा नसतांनाही चौथीत शिक्षण सोडावे लागले. त्यातच काहींनी तिच्यावर वाईट नजर ठेवली आणि तिला रेडलाईट नावाच्या नरकयातनेत ढकलून दिले. न कळत्या वयात ‘त्या’ नरकात ती ढकलली गेली ती कायमचीच. मात्र विसाव्या वर्षी कळायला लागल्यावर तिने या नरकातच स्वर्ग उभं करायचे ठरवले. २० वर्षात त्यांनी या क्षेत्रातील महिला आणि त्यांची होणारी उपेक्षा जवळून अनुभवली. एक दिवस त्यांच्या जवळचा मित्राचा एचआव्हीमुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा पन्ना यांच्या मनावर मोठा आघात झाला. यामुळे ज्या यातना आपल्याला भोगाव्या लागल्या त्या इतरांना भोगाव्या लागू नये या चांगल्या विचाराने पन्ना यांनी देहविक्री व्यवसाय सोडला. या क्षेत्रातील महिला आणि मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी समाजकार्याचा वसा हाती घेत त्यांच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी पन्ना यांनी लढा उभारला. रेड लाईट वस्तीत देहविक्री करणाºया महिलांना आणि तृतीयपंथीयांचे प्रबोधन करून दारू, सिगारेट पिऊ नका एक चागंले जीवन जगा, देह विक्री करू नका हा उपदेश देत मुख्यप्रवाहासाठी त्या प्रयत्न करत आहेत.
पन्ना यांच्या या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक कार्य करणाºया संस्थांनी त्यांच्या या कार्याची दखल घेत बेटी बचाओ बटी पढाओ, हिरकणी, योगिनी पुुरस्कार, समाजरत्न, क्रांती अशा अनेक पुरस्कारांने त्यांना सन्मानित केले आहे.
>स्त्री एक आई असते, बायको असते, बहीण असते. ती प्रत्येक रूपातून सर्वांचे भले करते. त्यामुळे समाजाने कोणतीही स्त्री असो तिचा आदर सन्मान प्रत्येकाने केला पहिजे. भले ती देहविक्री करणारी स्त्री असो किंवा तृतीयपंथी असो. समाजाने या लोकांचा आदर केला पाहिजे, देवाने त्यांनाही सर्वांप्रमाणेच दोन हात, पाय, नाक, डोळे दिले आहे. मग त्यांच्या सोबत तिरस्कार का करायचा!
-बी पन्ना, सामाजिक कार्यकर्त्या