कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक जखमी
By admin | Published: November 18, 2014 03:34 AM2014-11-18T03:34:23+5:302014-11-18T03:34:23+5:30
घरासमोर खेळत असणाऱ्या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवित बालकाला अक्षरश: काही अंतरापर्यंत फरफटत नेले. नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून बालकाची सुटका केली. मात्र
चिंचवड : घरासमोर खेळत असणाऱ्या दीड वर्षाच्या बालकावर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला चढवित बालकाला अक्षरश:
काही अंतरापर्यंत फरफटत
नेले. नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून बालकाची सुटका केली. मात्र, या
घटनेत बालक गंभीर जखमी
झाला आहे. ही धक्कादायक
घटना सोमवारी सायंकाळी चिंचवड मधील एसकेफ हैसिंग सोसायटीत घडला.
अर्पीत कोदली असे कुत्र्यांच्या हल्लयात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. कोदली कुटुंबिय या सोसायटीतील बी १३ या इमारतीच्या तळ मजल्यावर राहते. दुपारी साडेतीन वाजता अर्पीत सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. याच वेळी एका भटक्या कुत्र्याने अर्पीतचा चावा घेतला. त्यानंतर इतर तीन कुत्रीही अर्पीतवर धाऊन आली. चवताळलेल्या कुत्र्यांनी त्याला काही अंतरापर्यंत अक्षरश: फरफटत नेले. परिसरातील नागरिकांनी आरडा ओरडा करीत त्याची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. कुत्र्यांच्या हल्लयांत अर्पीतच्या हात, पाय व पाठीवर जखमा झाल्या. उपचारासाठी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. अर्पीतची प्रकृती स्थिर आहे.
या घटनेमुळे परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. या परिसरात अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या सोसायटीच्या मागे असणारया नाल्यामध्ये परिसतातील हॉटेल व्यावसायिक शिल्लक राहिलेले अन्न टाकत असल्याने याभागात कुत्र्यांचा नेहमी वावर असतो. (वार्ताहर)