अ‍ॅसिड उडाल्याने मुले जखमी

By admin | Published: June 16, 2015 12:41 AM2015-06-16T00:41:37+5:302015-06-16T00:41:37+5:30

कोथरूड भागातील अविश सोसायटीत बेकायदा शेतीविषयक कीटकनाशक तयार करणारे वीरेंद्र लोमटे यांच्या घरातील अ‍ॅसिड साफसफाई

Children injured due to acid attack | अ‍ॅसिड उडाल्याने मुले जखमी

अ‍ॅसिड उडाल्याने मुले जखमी

Next

कोथरूड/कर्वेगनगर : कोथरूड भागातील अविश सोसायटीत बेकायदा शेतीविषयक कीटकनाशक तयार करणारे वीरेंद्र लोमटे यांच्या घरातील अ‍ॅसिड साफसफाई करताना सकाळी सांडल्याने शिवराय शाळेतील मुले जखमी झाली.
रोहन चंद्रकांत जाधव, प्रसाद लहू शेडगे, स्वप्निल अप्पासाहेब बनकर, सौरभ अकुंश मालपोटे, अविनाश सिद्धनाथ कदम, स्वप्निल बाळू भिकुले, अभिषेक बाळासाहेब तनपुरे, विशाल अंकुश सकपाळ, अभिजित दाभाडे, अमिर ठोंबरे, आशुतोष कदम अशी जखमी मुलांची नावे आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
वीरेंद्र लोमटे यांनी रहिवासी सोसायटीत बेकायदेशीरपणे व्यवसाय सुरू केला असून धोकादायक द्रव्यांची साठवण केल्याबद्दल कोथरूड पोलिसांच्या वतीने रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवराय शाळेलगतच्या अविश सोसायटीत वीरेंद्र लोमटे यांच्या घराची साफसफाई सुरू असताना घरातील एका ५ लिटरच्या कॅनमध्ये शिल्लक असलेल्या कृषी औषधे बवनण्यासाठी आणलेल्या अ‍ॅसिडचे कॅन साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून खाली पडले. कॅन खाली पडताच फुटल्याने शाळेच्या आवाराबाहेर असलेल्या मुलांच्या अंगावर अ‍ॅसिडचे शिंंतोडे उडाले. त्यानंतर मुलांना प्रथमिक उपचार देऊन ससून रुग्णालयात पाठविण्यात आले.
पोलीस उपनिरीक्षक रवींद्र फड तपास करीत आहेत. तीव्रता कमी असली तरी सोसायटीच्या आवारात बेकायदा साठा ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील यांनी सांगितले.

कोथरूड पोलिसांनी चौकशी करावी
-अविश सोसायटीत मुलांच्या अंगावर अ‍ॅसिड उडाल्यानंतर लोमटे यांच्या घरातून कोथरूड पोलिसांनी अवैध अ‍ॅसिडचा साठा जप्त केला असून, रहिवासी सोसायटीच्या आवारात बेकायदेशीर व्यवसायाची निरपेक्ष चौकशी करून गुन्हा दाखल करावा. सध्या संबंधित प्लॅटधारकाकडून घर साफ करण्यासाठी अ‍ॅसिड आणल्याची माहिती देण्यात येत असली, तरी त्याबाबत शहनिशा करण्याची गरज आहे. कोणताही प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करताना आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे गरजेचे असल्याचे आरोग्य निरीक्षकांनी सांगितले.

Web Title: Children injured due to acid attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.