बच्चे लोग अब टेन्शन को मारो गोली! बारावी निकालानंतर नैराश्य आल्यास 'या' नंबरवर संपर्क साधा
By प्रशांत बिडवे | Published: May 25, 2023 04:45 PM2023-05-25T16:45:07+5:302023-05-25T16:45:36+5:30
अनेकदा निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचार करून मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते
पुणे: राज्य शिक्षण मंडळाने गुरुवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. अनेकदा निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचार करून मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या वतीने समुपदेशकांची नेमणूक केली आहे. गुरुवार (दि. २५) पासून पुढील आठ दिवस सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत संपर्क साधलेल्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क समुपदेशन करण्यात येणार आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागात मार्च-फेब्रुवारी महिन्यांत बारावीची परीक्षा घेण्यात आली. गुरुवारी निकाल जाहीर केला आहे. त्यानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाच्या वतीने या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाइन समुपदेशन सेवा देणार आहे. मंडळाच्या वतीने परीक्षा कालावधीतही समुपदेशन सेवा सुरू ठेवण्यात आली हाेती. विद्यार्थी तसेच पालकांनी समुपदेशकांशी बाेलण्यासाठी ७३८७ ४००९७०, ८३०८७५५२४१, ९८३४९५१७५२ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.