HSC Exam Result: राज्यात कोकणच्या मुलांची बाजी; सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के, मुंबई सर्वात कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 11:29 AM2023-05-25T11:29:22+5:302023-05-25T11:29:36+5:30

मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३ टक्के तर मुलांचे ८९.१४ टक्के

Children of Konkan compete in the state Highest result 96.01 percent, Mumbai lowest | HSC Exam Result: राज्यात कोकणच्या मुलांची बाजी; सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के, मुंबई सर्वात कमी

HSC Exam Result: राज्यात कोकणच्या मुलांची बाजी; सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के, मुंबई सर्वात कमी

googlenewsNext

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.२५) दुपारी दाेन वाजल्यापासून ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व काेकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( १२ वी ) परीक्षा घेण्यात आल्या हाेत्या. राज्यातील ३ हजार १९५ परीक्षा केंद्रांवर सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. 

राज्यात कोकणच्या मुलानी बाजी मारली असून सर्वाधिक निकाल ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई ८८.१३ टक्के  एवढा आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.७३  टक्के असून मुलांचा निकाल ८९.१४ टक्के एवढा आहे.मुलांपेक्षा ४.५९ टक्के जास्त आहे. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील आणि त्याची प्रिंटही घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती मिळणार आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येईल.

Web Title: Children of Konkan compete in the state Highest result 96.01 percent, Mumbai lowest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.