मुलांचा दिवसाचा सफर वडिलांसोबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:14+5:302021-01-25T04:13:14+5:30
दत्तवाडीतील वस्तीत संतोष केसकर वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा नीरज आणि मुलगी केतकी शालेय शिक्षण घेत आहेत. मुलांना घरात बसून ...
दत्तवाडीतील वस्तीत संतोष केसकर वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा नीरज आणि मुलगी केतकी शालेय शिक्षण घेत आहेत. मुलांना घरात बसून मोबाईल, टीव्हीची जास्त सवय लागू नये. या उद्देशाने केसकर त्यांना स्वतःबरोबर घेऊन जातात. संतोष केसकर कागदपत्रांच्या डिलिव्हरीची कामे करतात. तर त्यांच्या पत्नी पर्वती इंडस्ट्रीजमध्ये कामाला आहेत. हलाखीच्या परिस्थितीत मुलांना काही अडचण निर्माण होऊ नये. म्ह्णून दोघेही नोकरी करतात. केसकर सकाळी घरातून निघताना आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊनच बाहेर जातात. ऑर्डरनुसार डिलिव्हरी असल्याने थोडाफार वेळ मिळतो. त्यावेळी मुलांसोबत चित्र काढणे, अभ्यास करणे, खेळणे अशा गोष्टी करतात. मुलेही आनंदाने संपूर्ण दिवसा वडिलांसोबतच असतात.
.........
माझ्या मुलाला क्रिकेटर तर मुलीला शिक्षिका होयच आहे. सध्या मुले घरात बसून मोबाईलच्या आहारी चालली आहेत. त्यामुळे खेळण्याबरोबर अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. माझ्या मुलांना अशा वाईट सवयी लागू नये. म्हणून माझ्याबरोबर घेऊन जातो. त्यांचा अभ्यास, खेळणे, खाणे यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी जवळ असतात. ते अतिशय आनंदाने माझ्याबरोबर येतात.
- संतोष केसकर