Children's Day : बालदिन नेमका असताे तरी काय दादा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 06:50 PM2018-11-14T18:50:05+5:302018-11-14T18:50:55+5:30
राज्यातील अनेक शहरांमध्ये शेकडाे शालाबाह्य मुले असून त्यांना त्यांच्या लहान वयातच उपजिवीकेसाठी वस्तू विकाव्या लागत असल्याचे चित्र अाहे.
राहुल गायकवाड
पुणे : बादल, अानंद, जीवन या तीनही नावांमध्ये अायुष्याचा अर्थ दडला अाहे. ही नावं असलेले सहा- सात वर्षांचे चिमुकले पुण्यातील डेक्कन भागात दरराेज किचेन विकतात. ज्या वयात शाळेत जाऊन अभ्यासाचे धडे घ्यायचे त्या वयात हे चिमुकले अायुष्याचे धडे घेत अाहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा सारखाच. त्यांना बालदिन माहित अाहे का ? असे विचारल्यानंतर निरागसपणे ते म्हणतात बालदिन नेमका असताे तरी काय दादा ?.
बालकामगार काेणी असू नये, खेळण्याच्या वयात काेणाला काम करायला लागू नये यासाठी अनेक कायदे झाले. शाळाबाह्य मुलं किती हे शाेधण्यात सरकारची वर्षाेनुवर्षे गेली. परंतु रस्त्यावर राहणाऱ्या तसेच सिग्नलवर वस्तू विकणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण कमी झाले नाही. पुण्यातील अनेक चाैकांमध्ये सकाळ संध्याकाळ पाच- सहा वर्षांची मुले विविध वस्तू विकत असतात. यातील अनेक मुले ही भिकही मागत असतात. एकीकडे शाळांमध्ये बालदिन अानंदाने साजरा हाेत असताना दुसरीकडे सिग्नलवर एक किचेन काेणीतरी घ्यावे यासाठी लहानग्यांचा अाटापिटा सुरु हाेता. जिथे अायुष्याची शाश्वती नाही तेथे ही मुले बालदिन ते काय साजरे करणार. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या मुलांना शाळेत पाठविण्याचा प्रयत्न केला जाताे, तसेच त्यांच्यासाठी अनेक उपक्रम ही राबविले जातात. परंतु या संस्थांच्याही काही मर्यादा असल्याने प्रत्येक मुलापर्यंत त्यांना पाेहचता येत नाही.
शिक्षण हक्क कायद्यानुसार कुठलेही मुल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शालाबाह्य मुलांना एकत्रित करुन त्यांना शिक्षण देण्याची तरतूद करण्यात अाली अाहे. रस्त्यावरती वस्तू विकणाऱ्या मुलांची संख्या पाहिली असता हा कायदा केवळ कागदावरच असल्याचे चित्र अाहे. सरकारने भिकारी मुक्त अभियान हाती घेतले हाेते परंतु हे अभियान सुद्दा केवळ घाेषणांपुरतेच मर्यादित राहिले अाहे. एकिकडे लाखाे रुपये भरुन पालक अापल्या मुलांना चांगल्या शाळेत घालण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे शाळा नेमकी काय असते ? अाणि शिकून अामचं दारिद्र दूर हाेणार का ? या प्रश्नात हजाराे मुलं चाैकाचाैकांमध्ये भटकत अाहेत. बालदिनाच्या दिनी या रस्त्यावरच्या मुलांना काेणी काही गिफ्ट देण्याएेवजी ही मुलं अापल्याला मिळालेलं अायुष्य हेच गिफ्ट समजून पाेट भरण्यासाठी रस्त्यांवरती वस्तू विकत भटकत हाेती.