पुण्यातील बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर

By नम्रता फडणीस | Published: August 24, 2022 08:27 PM2022-08-24T20:27:31+5:302022-08-24T20:28:06+5:30

साहित्य अकादमीच्या वतीने बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा

Children's writer from Pune Dr. Children's literature award announced to Sangeeta Barve | पुण्यातील बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर

पुण्यातील बालसाहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांना बालसाहित्य पुरस्कार जाहीर

Next

पुणे: साहित्य अकादमीच्या वतीने देशातील २२ भाषांमधील साहित्यिकांना ’बालसाहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यामध्ये मराठी भाषेसाठी पुण्यातील प्रसिद्ध बालसाहित्यकार आणि कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांच्या 'पियूची वही' या साहित्यकृतीला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

डॉ. संगीता बर्वे यांचा कार्यपरिचय डॉ. संगीता बर्वे या मागील पाच वर्षांपासून अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषविले आहे. गंमत झाली भारी, उजेडाचा गाव, रानफुले, झाड आजोबा, खारूताई आणि सावलीबाई, मिनूचे मनोगत, भोपळ्याचे बी, नलदमयंती आणि इतर कथा आदी बालसाहित्य प्रकाशित आहे. मृगतृष्णा, दिवसाच्या वाटेवरून, अंतरीच्या गर्भी हे कवितासंग्रह प्रकाशित आहेत. गंमत झाली भारी, या रे या सारे गाऊ या, बच्चों की फुलवारी आदी व्हीसीडी आहेत. झिपरू आणि बोबडगाणी ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ’आदितीची साहसी सफर’ या पुस्तकाचा अनुवाद डॉ. बर्वे यांनी केला आहे. ’कच-याचा राक्षस’ आणि ’ग्रिनी’ हे पुस्तकही त्यांचे प्रसिद्ध आहे. डॉ. संगीता बर्वे यांनी विविध बालकुमार साहित्य संमेलनात साहित्याचे सादरीकरण केले आहे. अनेक शाळांमधून त्यांचे हजारो बालसाहित्याचे कार्यक्रम पार पडले आहेत.

मुलांनी लिहिते व्हावे

साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद आहे. मुलांनी दैनंदिनी लिहावी, या उद्देशाने ‘पियूची वही’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकांमुळे अनेक मुलांनी दैनंदिनी लिहिण्यास सुरूवात केली. या पुरस्कारामुळे हे पुस्तक आणखी मुलांपर्यंत पोहचेल. ते वाचून मुले रोजचा दिनक्रम लिहिण्यास सुरूवात करतील. मुलांनी लिहिते व्हावे, हाच या पुस्तक निर्मितीमागचा हेतू आहे. आणि तो साध्य झाला आहे. मुले मोठ्या संख्येने लेखनाकडे वळली असल्याचा मनस्वी आनंद आहे. - डॉ. संगीता बर्वे, बालसहित्यकार

Web Title: Children's writer from Pune Dr. Children's literature award announced to Sangeeta Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.