Pune Rain Update: जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरण 'ओव्हरफ्लो'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 05:44 PM2022-07-12T17:44:05+5:302022-07-12T17:44:12+5:30
पिंपळगाव-जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद
रोहोकडी : गेल्या सहा दिवसांपासून जुन्नर तालुक्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यामध्ये धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशांन सुरु असून दिवसागणिक पावसाचा जोर वाढत आहे. त्यामुळे धरणांच्यापाणी पातळीत वाढ झालेली असून ती वाढतच जाणार असे दिसते. रविवार दि:-१०जुलै सकाळी आठ वाजे पर्यंत पिंपळगाव-जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १६७ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
जून महिन्यात पावसाने जोरदार हुलकावणी दिली. त्यामुळे खरीप हंगाम वाया जातो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र अधून मधून तुरळक पाऊस पडत होता. म्हणून खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतिक्षा होती. त्यातच जुलै महिन्यात सुरुवातीस मान्सून चांगलाच सक्रिय झाल्याने कोकणासह सहयाद्री डोंगर रांगावर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले आहे. याशिवाय तालुक्यातील पश्चिम उत्तरे कडील भागात पाऊस धो धो कोसळत आहे. त्यामुळे खाचरे तुडुंब भरून वाहू लागली आहेत. ओढे नाले नद्या खळखळून वाहत आहेत.
जुलैपर्यंत पाऊस (मिलिमीटर)
पिंपळगाव-जोगे-३७८, माणिकडोह-३९९, येडगाव-२२५, वडज-१८०, चिल्हेवाडी-१७५,