मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:14+5:302021-03-22T04:10:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोर, डिझेल दरवाढीसोबतच आता खाद्यतेल, मिरची आणि मसाल्याच्या सर्वच पदार्थांच्या किमतीत यंदा चांगलीच दरवाढ ...

Chilies, spices hit by inflation | मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पेट्रोर, डिझेल दरवाढीसोबतच आता खाद्यतेल, मिरची आणि मसाल्याच्या सर्वच पदार्थांच्या किमतीत यंदा चांगलीच दरवाढ झाली आहे. यंदा हवामान बदलामुळे मध्यप्रदेशमध्ये पीक कमी आल्याने व मागील वर्षीचा कोल्डस्टोअरेजमध्ये असलेला ४० ते ४५ लाख पोते स्टॉक संपत आल्याने ही दरवाढ झाली असल्याची माहिती व्यापारी वालचंद संचेती यांनी दिली. यामुळेच यंदा गृहिणीच्या मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका लागला आहे.

उन्हाळ्याची चाहूल लागताच गृहिणीची मिरची, मसाले, पापड करण्याची लगबग सुरू होते. परंतु, यंदा गृहिणींच्या मिरची, मसाल्याला महागाईचा फटका बसणार आहे. यंदा सुरुवातीपासूनच मिरचीचे भाव चढेच राहिले आहेत. देशात आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत. त्याच्या खालोखाल महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, बंगाल येथे देखील उत्पादन होते. नवीन वर्षात सर्वप्रथम मध्यप्रदेशचे पीक निघते. परंतु, यंदा हवामान बदलामुळे मध्यप्रदेशमध्ये पीक कमी झालेले आहे. तर मागील वर्षी कोल्डस्टोअरेजमध्ये ४० ते ४५ लाख पोते स्टॉक होता तो संपला आहे.

सध्या रोज आंध्र व तेलंगणामध्ये १.५ ते २ लाख पोते व कर्नाटकमधून आठवड्याला ३.५ ते ४ लाख पोते आवक होत आहे. मसालेवाले यांच्याकडे ही विशेष माल शिल्लक नाही. यंदा सुरुवातीपासूनच भाव उंच राहिले. याचे मूळ कारण म्हणजे परदेशात मिरचीला सतत मागणी आहे. चायना, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, दुबई या देशांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यान यंदा २ ते २.२५ कोटी पोते, कर्नाटकमध्ये ६0 ते ७० लाख पोते, मध्य प्रदेशमध्ये ८ ते १० लाख पोते उत्पादन होईल. अशा प्रकारे देशामध्ये एकूण ३.२५ ते ३५० कोटी (प्रति पोते ४० ते ५० किलो) असू शकते. हल्ली एक्सपोर्ट व मसाला व्यापाऱ्यांची मागणी जोरात असल्यामुळे भाव तेजीत आहे .

------

पुण्याच्या मार्केट यार्डात आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटकमधून मिरचीची आवक

आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्याच्या खालोखाल महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, बंगाल येथे देखील उत्पादन होते. पुण्यात सध्या रोज आंध्रप्रदेशा व तेलंगणामध्ये १.५ ते २ लाख पोते व कर्नाटकमध्ये आठवड्याला ३.५ ते ४ लाख पोते आवक होत आहे.

---

हवामान बदलाचा फटका

देशात मिरचीचे सर्वाधिक उत्पन्न मध्यप्रदेशमध्ये होते. परंतु यंदा हवामान बदलाचा मोठा फटका मध्यप्रदेशमधील मिरची पीकाला बसला आहे. तसेच प्रदेशातून देखील मिरचीला व मसाल्याच्या पदार्थांना मागणि अधिक आहे. यात चायना, मलेशीया, बांगलादेश, श्रीलंका, थायलंड, दुबई या देशांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे..यामुळेच यंदा मिरची व मसाल्याच्या किंमती वाढल्या आहेत.

- वालचंद देवीचंद संचेती, मिरचीचे व्यापारी

--------

मिरचीचे दर (प्रती किलो)

प्रकार मागील वर्षीचे चालू वर्षीचे दर

बेडगी (साधी) १७५-२०० २४०-२५०

बेडगी (भारी) २१०-२२५ २७५-३००

बेगडी (काश्मिरी) २२५-२५० ३००-३२५

गंटुर ७०-८० १७०-१७५

तेज ८०-९० १८०-१९०

----------

मसाल्याचे दर (प्रती किलो)

धने - १८०-२००

जिरे- १७०-१७५

तीळ -१०४-१०५

खसखस - १६०

खोबर -१५२-१८०

मेथी - ७५-८०

हळद -११८

बदामफुल - १२००

बडीशेप - १२०-१२५

नाकेश्वर -१४५०

धोंडफूल -६००

वेलदोडे - ५२०

-

दरवाढ झाली तरी मसाले करावेच लागतात

यंदा खाद्यतेलासह, मिरची आणि अन्य सर्वच गरम मसाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. दरवाढ झाली तरी मसाले करावे तर लागतीलच. सध्या पापड-मसले करण्याची तयारी सुरु आहे.

- लक्ष्मी मोहन शिंदे, गृहिणी

Web Title: Chilies, spices hit by inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.