चिमुरडीचा खून करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 02:19 AM2018-07-09T02:19:04+5:302018-07-09T02:19:29+5:30
ताडीवाला रस्ता भागात टेम्पोत मृतावस्थेत सापडलेल्या सहा वर्षांच्या बालिकेचा गळा दाबून खून करणाºयास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे - ताडीवाला रस्ता भागात टेम्पोत मृतावस्थेत सापडलेल्या सहा वर्षांच्या बालिकेचा गळा दाबून खून करणाºयास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
गणेश बसवराज गायकवाड (मूळ रा़ गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे़ गीतांजली शाम वाघमारे (वय ६) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे. तिची आई अंजली (वय ३०) हिने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंजली ताडीवाला रस्ता भागातील नंदादीप हॉटेलनजीक असलेल्या पदपथावर वास्तव्यास आहे. पुणे स्टेशन परिसरात ती मोलमजुरी करून निर्वाह करते. तीन दिवसांपूर्वी तिची मुलगी गीतांजली नंदादीप हॉटेललगत लावलेल्या टेम्पोत बेशुद्धावस्थेत सापडली होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
ससून रुग्णालयात गीतांजलीच्या मृतदेहाचे विच्छेदन केले. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे नमूद केले. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे निखिल जाधव यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली़ गायकवाड मूळ गावी पळून जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले़ गायकवाड ४ जुलैला सायंकाळी टेम्पोजवळ झोपला असताना गीतांजली तिथे खेळत होती़ त्याने तिला शांत बसायला सांगितले़ पण तरीही ती तेथेच खेळत राहिल्याने त्याने नशेत तिचा गळा आवळला़ त्यात तिचा मृत्यू झाला़ लहान मुलीचा खून झालेला असताना खुनाचे नक्की कारण व खून करणाºयाबाबत काहीही खात्रीशीर माहिती नसताना पोलीस कर्मचारी निखिल जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून अटक केली़