चिमुकल्यांनी लुटला शेकोटीचा ‘ऑनलाईन आनंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:12 AM2021-01-25T04:12:43+5:302021-01-25T04:12:43+5:30

पुणे : गप्पा... गोष्टी... खेळ... धमाल आणि शेकोटी असा एकत्रित आनंद बालचमूंनी जवळपास एक वर्षाने अनुभवला. मा. स. गोळवकर ...

Chimukalya loots firecrackers 'online happiness' | चिमुकल्यांनी लुटला शेकोटीचा ‘ऑनलाईन आनंद’

चिमुकल्यांनी लुटला शेकोटीचा ‘ऑनलाईन आनंद’

Next

पुणे : गप्पा... गोष्टी... खेळ... धमाल आणि शेकोटी असा एकत्रित आनंद बालचमूंनी जवळपास एक वर्षाने अनुभवला. मा. स. गोळवकर गुरुजी विद्यालयातील पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन शेकोटी’चे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला भक्ती कापरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यासोबतच मुख्याध्यापिका मंजूषा खेडकर, संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकही उपस्थित होते. यावेळी मुलांनी ‘शेकोटी करा... शेकोटी करा’ या गाण्यावर ताल धरला. यावेळी पूर्व प्राथमिक विभागातील वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी धमाल केली. मनाली मांडके यांनी श्लोक म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी खेळ खेळून दाखवले. शिक्षिका स्वाती राजगुरू यांनी या खेळांचे संचालन केले. मकर संक्रांत, बोरनहाण, रथसप्तमी प्रत्यक्ष कृतीमधून दाखवित त्याचे महत्त्व सांगण्यात आले. दूध उतू गेलेले दाखवून रथसप्तमी, सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

मुख्याध्यापिका यांनी ‘हे सूर्या जय दिनकरा’ ही प्रार्थना सादर केली. तसेच सूर्याचे महत्त्व कथेद्वारे विशद करतानाच वाढदिवस रात्री १२ वाजता का साजरा करू नये हे सांगितले. ‘शेकोटी करा’ हे गाणे मनाली मांडके आणि प्रज्ञा पोतदार यांनी सादर केले. या वेळी शिक्षिकांनी शेकोटीभोवती फेर धरला. तर, कापरे यांनी विद्यार्थ्यांना गोष्ट सांगत प्रबोधन केले. सूत्रसंचालन आणि आभार अपर्णा साने यांनी मानले.

(फोटो : लक्ष्मण लॉगिनमध्ये स्कूल नावाने सेव्ह)

Web Title: Chimukalya loots firecrackers 'online happiness'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.