१९५ देशांचे ध्वज व राजधानी सांगणाऱ्या चिमुरडीचा जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:13 AM2021-07-07T04:13:35+5:302021-07-07T04:13:35+5:30

मूळचे आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची चार ...

Chimurdi's world record of flags and capitals of 195 countries | १९५ देशांचे ध्वज व राजधानी सांगणाऱ्या चिमुरडीचा जागतिक विक्रम

१९५ देशांचे ध्वज व राजधानी सांगणाऱ्या चिमुरडीचा जागतिक विक्रम

Next

मूळचे आंबेगाव तालुक्यातील चिंचोडी देशपांडे येथील बाळासाहेब आढळराव पाटील हे व्यवसायाच्या निमित्ताने दुबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यांची चार वर्षे ११ महिन्यांची कन्या ईशानवी बाळासाहेब आढळराव-पाटील हिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. १५ जून रोजी तिने १९५ देशांचे झेंडे ओळखून त्यांच्या राजधान्या केवळ तीन मिनिटे दहा सेकंद इतक्या जलद गतीने सांगण्याचा जागतिक विक्रम केला आहे. त्याद्वारे तिने जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. एक नव्हे तर तब्बल तीन विक्रमांना तिने गवसणी घातली आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व एशिया बुक ऑफ रेकॉर्ड या तीनही ठिकाणी तिच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

कोणतीही गोष्ट स्वयंस्फूर्तीने आत्मसात करण्यासाठी ईशानवीमध्ये असलेली जिद्द व चिकाटी कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया तिची आई नीता आढळराव व भाऊ आराध्य आढळराव यांनी व्यक्त केली आहे. जागतिक विक्रमाची नोंद केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आंबेगाव तालुक्याचे नाव ईशानवीमुळे आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाणार आहे.

फोटो छ ०६ मंचर ईशानवी आढळराव

060721\06pun_7_06072021_6.jpg

फोटो छ ०६ मंचर इशान्वी आढळराव

Web Title: Chimurdi's world record of flags and capitals of 195 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.