चिंचबाईवाडीत महिला झाल्या गावकारभारीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:12 AM2021-02-26T04:12:29+5:302021-02-26T04:12:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दावडी : चिंचबाईवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महिलाराज आले असून, गावगाडा त्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दावडी : चिंचबाईवाडी (ता. खेड) येथील ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महिलाराज आले असून, गावगाडा त्यांच्या हाती गेला आहे. सरपंचपदी शिवसेनेच्या पूनम संतोष गार्डी, उपसरपंचपदी धोंडाबाई शंकर रणपिसे यांची निवड झाली.
याआधी देखील गावच्या सरपंचपदी पूनम गार्डी या सरपंच म्हणून काम पाहत होत्या. मागील काळात त्यांनी अनेक विकासकामे व उपक्रम पार पाडले. व गावच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. त्यामुळे जनतेने पुन्हा एकदा त्यांना संधी दिलीय.
या वेळी नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, व सदस्य यांचा सत्कार खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती राजूशेठ जवळेकर, समर्थ फाऊंडेशन अध्यक्ष विजयसिंह शिंदे यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी नवनियुक्त सदस्य प्रकाश गार्डी, सखुबाई रणपिसे, जनाबाई रणपिसे, बाळू रणपिसे, दशरथ गार्डी यांच्यासह वाफगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन बबन दगडू रणपिसे, माजी सरपंच संतोष गार्डी, उपसरपंच बाळासो रणपिसे, पोपट गणपत रणपिसे, संचालक रामदास गार्डी, पोलीस पाटील एकनाथ गार्डी, तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग रणपिसे, शालेय समिती अध्यक्ष लक्ष्मण रणपिसे व गावातील तरुण सहकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नवनियुक्त सरपंच पूनम गार्डी म्हणाल्या की, राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून कामे केली जातील, गावच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल. गावातील सर्व ज्येष्ठ, तरुण सहकाऱ्यांना सोबतीने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील.
फोटो: पूनम गार्डी
फोटो: धोंडाबाई रणपिसे