चिंचोलीत घरफोड्या करून ४५ तोळे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:48 AM2018-05-09T03:48:29+5:302018-05-09T03:48:29+5:30
घोडेगावजवळील चिंचोली कोकण्यांची येथे दोन घरांमध्ये पहाटे चारच्या दरम्यान घरफोड्या झाल्या असून येथून ४५ तोळे सोने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. याच रात्री साडेअकराच्या सुमारास दोन व्यक्तींकडून बळजबरीने गळ्यातील सोनाच्या चेन काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घोडेगाव : घोडेगावजवळील चिंचोली कोकण्यांची येथे दोन घरांमध्ये पहाटे चारच्या दरम्यान घरफोड्या झाल्या असून येथून ४५ तोळे सोने व पन्नास हजार रुपये रोख असा ऐवज चोरीस गेला आहे. याच रात्री साडेअकराच्या सुमारास दोन व्यक्तींकडून बळजबरीने गळ्यातील सोनाच्या चेन काढून घेण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथे कांताराम सावळेराम घोलप सकाळी उठले असता सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले़ त्यांना कपाटातील दागिने व पैसे चोरीस गेल्याचे दिसले़ घराचा प्रमख दरवाजा उघडून चोरांनी दागिने व रोख १0 लाख ७४ हजार ६00 रुपयांचा ऐवज लंपास केले होते. तसेच शेजारी राहणाऱ्या जिजाबाई तुकाराम कानसकर यांच्या घरातही घरफोडी केली़ दागिने व रोख रक्कम असा ३ लाख ४३ हजार ३0 रुपयांचा ऐवज चोरी झाला़ त्यांच्याही घरातील सुटकेस व एक लोखंडाची पेटी शेतात नेऊन फोडली़ याच घराजवळील सागर दिनकर खिलारे यांच्या घराची कडी काढण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला़ परंतु घरातील लोक जागे झाल्याने चोरटे पसार झाले. घोडनदीच्या पुलाजवळ मंगेश कोकणे व अनिल आगळे या दोन तरुणांना अडवून मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याच्या सोन्याच्या चेन हिसकावून घेतल्या़ यावेळी दोन दुचाकींवर आलेल्या चार चोरांनी अडविले असल्याचे या दोघांनी सांगितले़ या चारही घटनेत १४ लाख १७ हजार ६३0 रुपयांचा माल लंपास केला आहे़
दरम्यान घोडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांनी पहाटे पोलिसांसह दोन्ही ठिकाणी पाहणी केली़ ताबडतोब सगळीकडे नाकाबंदी करून तपास
सुरू केला़ पुण्याहून श्वानपथक बोलावून चोरट्यांचा माग
काढण्याचा प्रयत्न केला़ घरातील कपाटे व वस्तूंवर पडलेले हाताचे ठसे घेतले आहेत.