Chinchwad Vidhan Sabha Election Result 2024 Live: जगताप-कलाटे- भोईर यांची तिरंगी लढत; चिंचवडमध्ये जगताप ३४ हजार ३२७ मतांनी आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:02 AM2024-11-23T11:02:58+5:302024-11-23T11:04:57+5:30
चिंचवडमध्ये शंकर जगतापांची आघाडी राहुल कलाटे तोडणार का?
Chinchwad Vidhan Sabha Election Result 2024 Live: चिंचवडच्या आखाड्यात महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी दुरंगी लढत वाटत असली तरी, अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर कुणाचा ताप वाढविणार, याविषयी चर्चा रंगली होती. मात्र अशातच आज मोजणीच्या पहिल्या फेरीपासून शंकर जगताप आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ७ व्या फेरीअखेर जगताप ३४ हजार ३२७ मतांनी आघाडीवर आहेत मागील वेळी ५१ टक्के, तर यंदा ५७ टक्के मतदान झाले आहे. उपनगरातील वाढलेले मतदान, वाढलेली मतदान टक्केवारी कुणाला तारक आणि मारक ठरणार, हे लवकरच होणार आहे. चिंचवडमध्ये शंकर जगतापांची आघाडी राहुल कलाटे तोडणार का? याकडे पिंपरी चिंचवडकरांचे लासखा लागून आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती. महायुतीचे बंडखोर नाना काटे, मोरेश्वर भोंडवे यांचे बंड शमले; पण, भोईर यांची बंडखोरी रोखण्यात अपयश आले, असे असले तरी महायुतीतील घटक पक्षांची एकजूट करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना यश आले. सुरुवातीस महायुती आणि महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी चुरस होती. मात्र, महायुतीतील बंड ९९ टक्के थंड करण्यात नेत्यांना यश आले, ही जमेची बाजू जगताप यांचे मताधिक्य वाढवू शकते.
इथं क्लिक करा >> महाराष्ट्र विधानसभा निकाल २०२४
या भागातील मतदार ठरवणार आमदार
जगताप यांचे वर्चस्व पिंपळे गुरव, जुनी सांगवी, पिंपळे सौदागर या भागामध्ये, तर कलाटे यांचे वर्चस्व वाकड, पुनावळे परिसर, थेरगावच्या काही भागांत आणि भोईर यांचे वर्चस्व चिंचवडगाव, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडीमध्ये आहे. आजवरच्या निकालांचा आढावा घेतल्यास काळेवाडी, रहाटणी, रावेत, किवळे या भागांत कोणा एकाचे वर्चस्व राहिलेले नाही. या भागात वाढलेला मतदार कुणाचा ताप वाढवणार, हे निकालात समजणार आहे.