इंदापूर तालुक्यात चिंकारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:15+5:302021-05-21T04:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कळस : काझड (ता. इंदापूर) येथे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पळून जात असताना दोन आरोपींना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कळस : काझड (ता. इंदापूर) येथे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पळून जात असताना दोन आरोपींना मृत हरणासह ताब्यात घेण्यात आले आहे. वन कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडे १ बंदूक, ६ जिवंत काडतुसे, एक पुंगळी व सर्च लाईटसह दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, महेश जंगलू माने (वय ४०, रा. सणसर, ता. इंदापूर) व दत्तात्रेय पोपट पवार (वय ४२, रा. बोरी, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघेजण मंगळवारी (दि.१८) रात्री चिंकारा हरणाची शिकार करून दुचाकी वरून घेऊन निघाले होते. यावेळी कळस-काझड रस्त्यावरील फिरंगाई मंदिराजवळ आढळून आले. वन कर्मचारी दिसताच त्यांनी पळ काढला. मात्र ग्रामस्थांच्या मदतीने या आरोपींना शिकारीचे साहित्य व शिकार केलेल्या मृत हरणासमवेत ताब्यात घेतले आहे. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अशोक नरोटे, वनरक्षक पूजा काटे, वनमजूर ज्ञानदेव ससाणे यांनी ही कारवाई केली.
———————————————
...तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढले
तालुक्यातील वन्य प्राण्यांची शिकार ही नेहमीच होत आहे. कुंभारगाव येथे १ मे च्या रात्री खोकड प्राण्याची शिकार केल्याच्या आरोपाखाली कुंभारगाव येथील दोन आरोपी ताब्यात घेतले होते. यानंतर आज पुन्हा शिकार उघडकीस आली आहे. तालुक्यात हजारो हेक्टर मोठे वनक्षेत्र आहे. यामध्ये चिंकारासह अनेक प्राणी आहेत. मात्र त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
—————————————
फोटोओळी—काझड येथे चिंकारा जातीच्या हरणाची शिकार करून पळून जात असताना दोन आरोपींना मृत हरणासह ताब्यात घेण्यात आले आहे .
२००५२०२१ बारामती—०२