चिन्मय कुलकर्णीला बुद्धिबळाचे विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:42 AM2017-08-03T02:42:43+5:302017-08-03T02:42:43+5:30

एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ४२व्या सत्रात चिन्मय कुलकर्णी याने अफलातून कामगिरी करीत ७ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली. सिम्बायोसिस भवनाजवळील मंगलवाडी कममर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली.

Chinmaya Kulkarni won the chess championship | चिन्मय कुलकर्णीला बुद्धिबळाचे विजेतेपद

चिन्मय कुलकर्णीला बुद्धिबळाचे विजेतेपद

Next

पुणे : एव्हरी संडे जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या ४२व्या सत्रात चिन्मय कुलकर्णी याने अफलातून कामगिरी करीत ७ गुणांसह विजेतेपदाला गवसणी घातली.
सिम्बायोसिस भवनाजवळील मंगलवाडी कममर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. ७ फेरींचया या स्पर्धेत चिन्मयने अपराजित राहण्याची कामगिरी करताना प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. अखेरच्या फेरीत चिन्मयने सौरव साहू याच्यावर मात केली. ५.५ गुण मिळविणारा निखिल दीक्षित दुसºया क्रमांकाचा मानकरी ठरला. ६ फेींअखेर ४.५ गुण असताना निखिलने सातव्या आणि अखेरच्या फेरीत रणवीर मोहितेला नमवून दुसरे स्थान प्राप्त केले. निखिलइतकेच गुण मिळवूनही वेदांत पिंपळखरे याला तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. आंतरराष्ट्रीय आर्बिटर राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले.
अंतिम फेरीचे निकाल : चिन्मय कुलकर्णी (७) विवि सौरव सहू (४.५). आकांक्षा हगवणे (५) विवि वेदांज पिंपळखरे (५.५).
रणवीर मोहिते (४.५) पराभूत वि. निखिल दीक्षित (५.५). कल्पेश देवांग (४.५) पराभूत वि. सोहम दातार. नमित चव्हाण (५) विवि सारंग गडेकर (४). गौरव दास (५) विवि हिमांशू छाबडा (४). सिद्धांत ताम्हणकर (४) पराभूत वि. तेजस जोशी (५). अखिलेश नागरे (४) पराभूत वि. गौरव हगवणे (५). गायत्री शितोळे (४) पराभूत वि. रोहन जोशी (४.५). प्रकाश करमरकर (४) विवि. विक्रांत कुरकुटे (३.५).

Web Title: Chinmaya Kulkarni won the chess championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.