थेऊर येथे चिंतामणी ग्रामविकासने जिंकल्या १० जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:50+5:302021-01-19T04:11:50+5:30

थेऊर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने दहा जागा जिंकून बाजी मारली असून विरोधातील म्हातारी आई माता ग्रामविकास पॅनेलला ...

Chintamani Rural Development won 10 seats at Theur | थेऊर येथे चिंतामणी ग्रामविकासने जिंकल्या १० जागा

थेऊर येथे चिंतामणी ग्रामविकासने जिंकल्या १० जागा

Next

थेऊर

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने दहा जागा जिंकून बाजी मारली असून विरोधातील म्हातारी आई माता ग्रामविकास पॅनेलला सात जागांवर समाधान मानावे लागले. एकूणच निकालाचा कल पाहता येथील मतदारांनी विकासकामांना पसंती देत ग्रामपंचायतीची सूत्रे पुन्हा तात्यासाहेब काळे व हिरामण काकडे यांच्या ताब्यात दिली आहे. जय गणेश परिवर्तन आघाडीच्या चारही उमेदवारांना मतदारांनी विजयापासून दूर ठेवल्याने आघाडीच्या गटात सन्नाटा पाहावयास मिळाला.

राज्य कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे यांचे नेतृत्वाखालील चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केल्याने विरोधकांचे सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे उद्ध्वस्त झाले. वाॅर्ड क्रमांक एकमधून म्हातारी आई माता ग्रामविकास पॅनेलचे संतोष किसन काकडे, गणेश सुदाम गावडे, चंद्रभागा ईश्र्वर शिर्के यांनी विजय मिळविला.

वाॅर्ड क्रमांक दोनमधून म््हातारी आई ग्रामविकास पॅनेलचे संजय महादेव काकडे व चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे शशिकला दत्तात्रय कुंजीर, रुपाली गणेश रसाळ हे विजयी झाले आहेत. वाॅर्ड क्रमांक तीनमधून चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे विठ्ठल रामचंद्र काळे,मंगल महादेव धारवाड हे विजयी झाले आहेत.

वाॅर्ड क्रमांक चारमधून चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे आप्पासाहेब रामचंद्र काळे, गौतमी मारुती कांबळे व राहुल शनिदेव कांबळे हे विजयी झाले आहेत. वाॅर्ड क्रमांक पाचमधून महातारी माता ग्रामविकास पॅनेलचे मनीषा नवनाथ कुंजीर, जयश्री भरत कुंजीर व पल्लवी गणेश सांळुखे विजयी झाले.थेऊर गावचे सर्वाधिक लक्ष लागलेल्या वाॅर्ड क्रमांक सहामधून चिंतामणी ग्रामविकास पॅनेलचे युवराज हिरामण काकडे, शीतल शरद काकडे व सीमा सुखराज कुंजीर यांनी दणदणीत विजय मिळवल्याने विरोधकांची मोठी निराशा झाली.

Web Title: Chintamani Rural Development won 10 seats at Theur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.