चित्रबलाक पक्ष्याला दिले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:11 AM2021-02-24T04:11:43+5:302021-02-24T04:11:43+5:30
पक्षीमित्र अॅड. अशफाक सय्यद यांना मोबाइल फोनद्वारे माहिती मिळाली की, चित्रबलाक पक्षी जखमी आहे. त्यांनी त्वरित वन विभागाचे कर्मचारी ...
पक्षीमित्र अॅड. अशफाक सय्यद यांना मोबाइल फोनद्वारे माहिती मिळाली की, चित्रबलाक पक्षी जखमी आहे. त्यांनी त्वरित वन विभागाचे कर्मचारी संतोष गिते यांना याबाबत सांगितले. त्या वेळी गिते हे त्यांच्या टीमसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. चित्रबलाक पक्षी हा चिंचेच्या झाडावर उंच ठिकाणी अडकलेला असल्याने त्याला तेथून काढणे जवळपास अशक्य होते. परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत हुशारीने जिवाची पर्वा न करता चिंचेच्या झाडावर शिडीच्या साहाय्याने चढून एका बाबूंच्या मदतीने झाडाची फांदी बाजूला सरकवली व चित्रबलाक पक्ष्याला स्थानिक लोकांनी सद्दाम सयद यांच्या हॉटेलवरील कापड काढून त्याची झोळी करून त्यात अलगद झेलले.
वनविभाग कर्मचारी संतोष गिते, गणेश बगाडे व बाळू वाघमोडे यांनी चित्रबलाक पक्ष्याला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उपचार करून पळसदेव येथे नदीकाठी सोडून दिले.
२३ इंदापूर पक्षीमित्र
स्थानिक नागरिक चित्रबलाक पक्ष्याला वनविभागाच्या ताब्यात देताना.