पोलीस बंदोबस्तात तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 02:35 AM2018-11-17T02:35:45+5:302018-11-17T02:37:55+5:30

दोन गटांतील दोन उमेदवारांच्यात चुरशीने झालेल्या मतदान प्रक्रियेत भारत खोमणे यांचा ७७ मतांनी विजय झाला. विविध प्रकाराने गाव तालुक्यात सारखे चर्चेत असते

The choice of the president of the Panchamukti police constable | पोलीस बंदोबस्तात तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड

पोलीस बंदोबस्तात तंटामुक्तीच्या अध्यक्षांची निवड

Next

वडगाव निंबाळकर : दोन वेळा ग्रामसभा होउनही तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी एकमत होत नसल्याने अखेर पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रतिक्रिया घ्यावी लागली. हा प्रकार बारामती तालुक्यातील कोºहाळे खुर्द गावात नुकताच घडला आहे.

दोन गटांतील दोन उमेदवारांच्यात चुरशीने झालेल्या मतदान प्रक्रियेत भारत खोमणे यांचा ७७ मतांनी विजय झाला. विविध प्रकाराने गाव तालुक्यात सारखे चर्चेत असते. ग्रामसभेत तंटामुक्त समिती अध्यक्ष निवड सहमतातून करण्याचे प्रयत्न झाले; पण ग्रामस्थांनी सभा उधळत्नन लावली. गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया व्हावी, असे ग्रामस्थांचे मत होते. यामुळे गुरूवारी (दि. १५) विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. सरपंच गोरख खोमणे अध्यक्षस्थानी होते. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दत्तात्रेय खांडेकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. सकाळी अकरापासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे गावात तणावाचे वातावरण होते. वृद्ध व्यक्तींनाही मतदानासाठी आणले होते. १ हजार ३३ नागरिकांनी मतदान केले. सायंकाळी मतमोजणी झाली. या वेळी ५२ मते बाद निघाली. ५२९ मते भारत मारूती खोमणे यांना, ४५२ मते मारूती पांडुरंग खोमणे यांना पडली. ७७ मतांनी भारत खोमणे यांचा विजय घोषीत करण्यात आला.

निवडीनंतर मिरवणुकीला बंदी असल्याने फक्त गुलालाची उधळण करत आनंद साजरा करण्यात आला. विजयी उमेदवार सरपंच गोरख खोमणे, डॉ. मनोज खोमणे यांच्या बाजूचा तर पराभूत उमेदवार माजी सरपंच धनंजय खोमणे, राहुल खोमणे, सूरज खोमणे यांच्या गटाचा होता.
 

Web Title: The choice of the president of the Panchamukti police constable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे