चिलटांचा उपद्रव; पुणेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 01:12 AM2017-12-30T01:12:06+5:302017-12-30T01:12:12+5:30

पुणे : शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत उडणा-या लहान-लहान चिलटांची संख्या अचानक वाढली आहे.

Cholera nuisance; PUNEKAR HARANA | चिलटांचा उपद्रव; पुणेकर हैराण

चिलटांचा उपद्रव; पुणेकर हैराण

Next

पुणे : शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत गेल्या दोन-तीन दिवसांपासून हवेत उडणा-या लहान-लहान चिलटांची संख्या अचानक वाढली आहे. यामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले असून, गाडी चालवताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये सातत्याने बदल होत आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी सध्याचे वातावरण चिलटांच्या पैदाशीला पोषक ठरले आहे. रस्त्यावर, बागांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी चिलटांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील वाढता कचरा आणि अस्वच्छतेमुळे शहराच्या विविध भागांत दुर्गंधी पसरली आहे. अस्वच्छतेमुळे चिलटे, डास आणि कीटकांचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. अनेक दुचाकीचालकांना या चिलटांनी वाहन चालवताना डोळ्यांसमोर घोंघावून अगदी हैराण करून टाकले आहे. सध्या पुण्यातील हवेमध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे चिलटांचे प्रमाण वाढले आहे, पण चिलटांमध्येही अनेक प्रकार आहेत. यातील काही दुर्गंधीवर जगणारे असतात. डोळ्यांशी निगडित संसर्गजन्य आजाराची साथ असल्यास रोगाचा प्रसार वेगाने होऊ शकतो.
>दोन दिवस त्रास कायम राहणार
शहरामध्ये वाढलेल्या चिलटांचा पुढील दोन दिवस त्रास कायम राहणार आहे. गाडी चालवताना अनेकांच्या डोळ््यात ही चिलटं गेल्याने प्रचंड आग होते. परंतु डोळ््यासाठी धोकादायक नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
सध्या वातावरण प्रचंड वेगाने बदलत आहे. सकाळी थंडी व दुपारी गरम हवा म्हणून चिलटांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या किड्यांचे नाव ‘अ‍ॅफिड स्वार्म’ असे आहे. वनस्पतींचा रस शोषतात, म्हणून त्यांना वनस्पतीवरील ढेकूण (प्लाट बग) असेही म्हणतात. प्रदूषणाशी त्यांचा काही संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
- डॉ. राधाकृष्ण पंडित,
प्राणीशास्त्र विभागप्रमुख

Web Title: Cholera nuisance; PUNEKAR HARANA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.