नाताळसाठी सजले चर्च
By admin | Published: December 25, 2015 02:00 AM2015-12-25T02:00:15+5:302015-12-25T02:00:15+5:30
ख्रिश्चन बांधवांचा सर्वांत मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. शहरातील चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली
पुणे : ख्रिश्चन बांधवांचा सर्वांत मोठा नाताळ सण अर्थात प्रभू येशूंचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. शहरातील चर्चना विद्युत रोषणाई करण्यात आली असून सकाळी सामूहिक प्रार्थना तर संध्याकाळी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘जिंगल बेल, जिंगल बेल, जिंगल आॅल दि वे’च्या सुरांंमध्ये शहरात दरवर्षी नाताळचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिस्ती बांधव सकाळी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. त्यानंतर सर्वत्र केक आणि ख्र्रिसमस ट्रीसह ठिकठिकाणी सांताक्लॉज अवतरतात. ख्रिस्ती बांधव एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देतात. नाताळचा उत्सास सर्वधर्मीयांमध्ये पाहायला मिळतो. चर्चची सौंदर्यपूर्ण वास्तू, चर्चबाहेर असलेले चांदण्या, मेणबत्त्या, येशू ख्र्रिस्तांच्या जन्माचा देखावा, आदी तयारी पूर्ण झाली आहे. कँप, कोरेगाव पार्क, खडकी अशा विविध परिसरांमध्ये चर्च, कार्यालये, घरामध्ये रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, ख्रिसमस ट्री तसेच येशूच्या जन्मस्थळाच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत. या उत्सवासाठी शहरात ठिकठिकाणी संगीताच्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.