नाताळ संदेश -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:47+5:302020-12-25T04:10:47+5:30
बिशप थॉमस डाबरे यंदाचा आनंददायी नाताळ सण सर्व लोकांना एकत्रितपणे राहण्याचा संदेश घेऊन येत आहे. ख्रिस्ती श्रद्धेनुसार परमेश्वर ...
बिशप थॉमस डाबरे
यंदाचा आनंददायी नाताळ सण सर्व लोकांना एकत्रितपणे राहण्याचा संदेश घेऊन येत आहे. ख्रिस्ती श्रद्धेनुसार परमेश्वर मानवतेशी येशू ख्रिस्तांमध्ये एकरूप झाल्याचे मानतो. प्रभू येशू कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांबरोबर एकत्रितपणे जगले. सर्व भाषा, संस्कृती आणि धर्माच्या लोकांचा त्यांनी स्वीकार केला. त्यांनी आपले आयुष्य गरीब, गरजूंना मदत करण्यास सार्थकी लावले. कोरोना विषाणूने आपल्या सर्वांना हाच धडा शिकवला आहे. हा संसर्गजन्य रोग जगभरात झपाटयाने पसरला. या घातक रोगापासून हे प्रकर्षाने जाणवते की आपण सर्व एकमेकांशी जोडलेलो आहोत.
येशू ख्रिस्ताने शिकवले की, दुसऱ्यांचा आनंद, दुःख, अडचणी आणि वेदना आपल्या मानुयात. त्यांनी लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत केली. त्यांनी संकुचित मार्ग सोडून खुले मन आणि व्यापक दृष्टी बाळगण्याचा सल्ला जनतेला दिला. जीवनप्रवासात आपण एकत्रितपणे कार्य करीत राहिलो. तरच जीवनाच्या या शर्यतीत आपण यशस्वी ठरू.