प्रभात रस्त्यावर चक्क टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:15 AM2021-02-17T04:15:06+5:302021-02-17T04:15:06+5:30

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात तेही चक्क प्रभात रस्त्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ...

Chucky tanker on the road in the morning | प्रभात रस्त्यावर चक्क टँकर

प्रभात रस्त्यावर चक्क टँकर

Next

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागात तेही चक्क प्रभात रस्त्यावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. मात्र या समस्येचे मूळ शोधण्यात अजूनही पालिकेला यश आले नसल्याची तक्रार या भागातील नागरीक करत आहेत.

पुण्यातला प्रभात रस्ता, डेक्कन परिसर हा सुखवस्तू भाग मानला जातो. त्यामुळे या भागातल्या सोयी सुविधांकडे महापालिकेचे कायम लक्ष असते. काही अडचण आली तरी नागरिकसुद्धा अत्यंत सहजपणे तो प्रश्न लोकप्रतिनिधींकडे मांडत असतात. मात्र गेल्या काही दिवसांत नेमकी अडचण काय आहे हेच समजत नसल्याने टँकर मागवण्याची वेळ प्रभात रस्त्यावरील काही रहिवाशांवर आली आहे.

स्थानिक रहिवासी शिल्पा गोडबोले यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, गेल्या दोन आठवड्यांपासून आम्हाला हा प्रश्न भेडसावतो आहे. टँकर ते पाणी वापरताना अनेक अडचणी येतात. याच परिसरातील आणखी एक नागरिक म्हणाले, “अक्षरश: पहिल्या मजल्यावर देखील पाणी येत नाही. अनेकांनी पाईपलाईन बदलण्यास सुरुवात केली आहे. तरी देखील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. दोन वर्षांपूर्वी अशीच अडचण आम्हाला आली होती. एवढी परिस्थिती येण्याच्या आतच महापालिकेने उपाययोजना करावी.”

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, या ठिकाणी अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठवले आहे. पाण्याचा दाब नीट नसल्याने पुरवठ्यात अडचणी येत असाव्यात. यात सुधारणा करण्याचा प्रयत्न चालू आहे.

Web Title: Chucky tanker on the road in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.