कुरकुंभकरांचा गुदमरतोय श्वास ! औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:52 AM2018-04-05T02:52:48+5:302018-04-05T02:52:48+5:30
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.
कुरकुंभ - कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच्या प्रक्रिया उद्योगामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे.
कुरकुंभ येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनीक प्रकल्पात रासायनिक व इंजिनीअरिंग असे दोन विभाग करण्यात आले आहेत. ग्रामस्थ व नागरिकांनी वारंवार तक्रारी करु नही प्रदुषणाला आळा घालण्याकडे कंपनी कानाडोळा करीत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे.
या प्रकल्पातून उत्पादित होणारे वायू प्रदूषण रोखण्याचे नवीन आव्हा न उभे ठाकले आहे. मागील ३० वर्षांपासून या घातक प्रक्रियेतून उत्सर्जित होणाऱ्या वायुमुळे नागरिकांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदुषित हवेचा लहान मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. कुरकुंभच्या लोकवस्तीपासून अगदी जवळच टायर जाळण्याच्या दोन कंपन्यांना परवानगी दिली गेली आहे. यामध्ये रोज जवळपास वीस टन टायर जाळले जातात. त्यापासून उत्सर्जित होणा-या काळ्या धुरापासून व त्यामधून निघणाºया प्राणघातक वायूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कुरकुंभ परिसरात जाणवत आहे.
औद्योगिक परिसरातील विविध कंपनीतील प्रदूषणाचा प्रश्न सध्या खूप भेडसावत आहे. कंपन्या अगदीच गावालगत असल्याने याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे. नागरिकांच्या सूचनेला केराची टोपली दाखवून तालुक्यातील राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप वापरून सामान्य नागरिकांना वेठीस धरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतच्या मासिक सभेत कंपनीला बंद करण्याचा ठराव घेण्यात आला असून कंपनी मालकांना तो पाठवण्यात आला आहे
- रशीद मुलाणी,
प्रभारी सरपंच, कुरकुंभ
कंपनीच्या आसपासच्या भागातील परिसर काळवंडला
टायर जाळण्याच्या प्रक्रियेच्या कंपन्या इंजिनिअरिंग झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना परवाना देताना महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने संपूर्ण परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊनच परवाना देणे आवश्यक होते. कंपनीच्या माध्यमातून होणाºया वायू प्रदूषणाच्या तक्रारी आल्यानंतर प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा झाली असून त्यांना तत्काळ याबाबत निर्णय घेण्याबाबत सांगितले आहे.
- विजय पेटकर, उपअभियंता अधिकारी,
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कुरकुंभ